Breaking

शुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१

सारोळा येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप.


सारोळा येथे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकाचे वाटप.

उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथील जल्हिा परिषद केंद्रीय शाळेतील वद्यिार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते शुुक्रवारी (दि.३) पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले.
शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्याना शिक्षण विभागाकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात येत आहे. प्रशालेतील २२१ विद्यार्थ्यांना पुस्तके देण्यात येत आहेत. शुक्रवारी सरपंच प्रशांत रणदिवे, उपसरपंच भाग्यश्री देवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक टी. एन. वनकळस, शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. मगर, वर्गशिक्षिका एस. आर. भुतेकर, उर्मिला देवगिरे आदींसह विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा