जमीनीच्या वादातून मुलगा व आईला कोयत्याने मारहाण. आठ जनाविरोधात गुन्हा दाखल
फलटण(प्रतिनिधी) जमीन आम्ही घेतली आहे इथे वहिवाट करू नका असे म्हणणाऱ्या मुलास व त्याच्या आईस शिवीगाळ करून ही जागा आमची आहे,आम्ही काहीपण करू असे म्हणत मुलास कोयत्यासारख्या हत्याराने मारहाण करून जखमी केल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात 8 जनाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे
या बाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी कुरवली बुद्रुक (ता फलटण) येथे सचिन अंकुश जेडगे ( वय २५ ) व्यवसाय शेती याने विकत घेतलेल्या टिकोळे यांच्या शेतात अनंतकुमार बापू सूळ हा ट्रॅक्टर ने वहिवाट करीत होता. त्यामुळे सचिन अंकुश जेडगे व त्याची आई तुम्ही आमच्या जमिनीत वहिवाट करू नका असे म्हणाले असता अनंतकुमार बापू सूळ, अक्षय युवराज माने, अमोल युवराज माने, पंकज कैलास गुईकर, सोनू रामा पडळकर ( सर्व रा.कुरावली बुद्रुक , ता. फलटण ) व इतर ३ ते ४ व्यक्तीनी सचिन व त्याचे आईस शिवीगाळ करून दमदाटी केली व हे आमचे शेत आहे आम्ही वहिवाट करणार असे म्हणून अक्षय युवराज माने, अमोल युवराज माने, पंकज कैलास गुईकर यांनी हातात असणारे लाकडी काठीने व कोयत्या सारखे हत्याराने सचिन जेडगे यांना मारहाण करून उजव्या पायाच्या नडगीवर मारून फॅक्टर केले आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार मोहन हंगे करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा