दिलिषा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चॉईस टाऊनशिप मुळे टेंभुर्णी शहराच्या वैभवात भर-- दत्तात्रेय भरणे
*सोलापूर जिल्ह्यात कुठेही बोलायचं म्हणलं तर मी ताक फुकुन पिल्या सारखे बोलतो.... पालकमंत्री दत्तात्रेय भरणे*
टेंभूर्णी (प्रतिनिधी):-अमोल भोसले
दिलिषा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चॉईस टाऊनशिपने टी पी मंजूर लेआऊट मंजूर करून एक सुसज्ज असे एन ए प्लॉटिंग केले आहे. या प्लॉटिंग मुळे शेजारील जागेचे भाव वाढून टेंभुर्णी शहराच्या वैभवात भर पडणार आहे. प्रामाणिक पणे काम करणाऱ्याला अडचणी येतात व त्रास होतो. पण त्याचे फळ नक्कीच चांगले मिळते असे दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
ते माढा तालुक्यातील टेंभूर्णी येथील दिलिषा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चॉईस टाऊनशिप या एन ए प्लॉटचे विक्री शुभारंभ प्रसंगी बोलत होते. आ बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे आयोजक दिलिषा बिल्डर्स तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले, चॉईस टाउनशिपचे मालक शांतीलाल बागवाले राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष रमेश पाटील, दिपक पाटील, संतोष पाटील हे होते तर आयोजन अविनाश भोसले यांनी केले होते.
डिझेल पेट्रोल चा भाव शंभर रुपये झाला आहे. पण उसाचा भाव गेली अनेक वर्षा पासून दोन हजार रुपयाच्या आसपासच आहे. उसाला दर वर्षी दोनशे रुपये वाढ मिळाली पाहिजे.
या प्लॉटिंग मुळे टेंभूर्णी शहराच्या वैभवात भर पडणार आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी नौकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करावा.असे आवाहन आ बबनदादा शिंदे यांनी केले. प्लॉटिंगच्या आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
पूर्वी व्यवसायावर ठराविक लोकांची मक्तेदारी होती.परंतु सध्या बहुजनांची, शेतकऱ्यांची मुले व्यवसायात उतरली आहेत. राज्य शासनाने गुंठे वारी जागेच्या खरेदी विक्री बंद केल्यामुळे बिल्डर्स लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. खरेदी विक्रीचे व्यवहार सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत असे बंडुनाना ढवळे यांनी सांगितले.
यावेळी शिवाजीराव पाटील, दिलीपराव भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अविनाश भोसले, सूत्रसंचालन राजेंद्र मुळे यांनी तर आभार रमेश पाटील यांनी मानले.
यावेळी मल्हार आर्मी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे, तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, प्रमोद कुटे, नागनाथ खटके, ग्रा. पं सदस्य भाऊसाहेब महाडिक-देशमुख, विजयकुमार कोठारी, विनोद पाटील, रामभाऊ शिंदे, राष्ट्रवादी तालुका युवकचे संभाजी पाटील, भीमराव भरगंडे, राष्ट्रवादी तालुका उप अध्यक्ष सतिश काळे, मयूर काळे, कल्याण अनपट, प्लॉटिंग क्षेत्रातील सर्व डेव्हलपर्स सह टेंभूर्णी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा