मसला खुर्द जि.प.शाळेस सुंदर माझे कार्यालय अभियान २०२०-२१ चा जिल्हा पुरस्कार.
जिल्हा परिषद उस्मानाबाद कार्यालयाच्या वतीने (दि.१७)रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून सुंदर माझे कार्यालय अभियान २०२० -२१ अंतर्गत जिल्हा पुरस्कार जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मसला खुर्द शाळेस गौरविण्यात आले.
यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा) अरविंद मोहिरे शिक्षणाधिकारी(मा) गजानन सुसर तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभागांचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
सदरील पुरस्कार शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनिल शिंदे, केंद्रप्रमुख ऋषी भोसले,मुख्याध्यापक मारुती घंदूरे आणि सर्व शिक्षक वृंद यानी स्वीकृत केला.
पुरस्कार पात्र सर्वांचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन जाधव, शिक्षण विस्तार अधिकारी डॉ. यशवंत चव्हाण' शिक्षण विस्ताराधिकारी दैवशाला शिंदे, सरपंच सौ.प्रफुलत्ता नरवडे,ग्रामसेवक श्री. वैभव ताटे तसेच ग्रामस्थांमधून शाळेचे अभिनंदन करण्यात आले.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा