Breaking

गुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१

कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता तात्काळ आर्थिक मदत करा* - ‌ *संभाजी ब्रिगेड उमरी*



*कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता तात्काळ आर्थिक मदत करा* - ‌ *संभाजी ब्रिगेड उमरी*




नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट


उमरी:- तालुक्यात ढगफुटी सद्रश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी कमीतकमी 50 हजारांची तत्काळ व सरसकट मदत करावी 
  दिनांक ६ ते ७ सप्टेंबर या दिवशी संपुर्ण तालुक्यात ढगफुटी सद्रश्य पाऊस झाला.या पावसाने गोदावरी नदी काठावरील शेतीचे मोठे नुकसान झाले या पावसाने शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले पिक सोयाबीन,कापूस,तूर,ऊस,हळद तर वाहुन गेलेच पण शेतातील मातीसुद्धा वाहुन गेली.मग अश्या परिस्थितीत कागदी पंचनामे करून सरकारने घोडे नाचवु नये सरसकट कमीतकमी हेक्टरी 50 हजारांची तत्काळ मदत करावी असे निवेदन देण्यात आले.
  यावेळी, योगेश पा मोरे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष उमरी,बालाजी पाटील ढगे क्रांतीवीर छावा युवा जिल्हाध्यक्ष,राजेश पा मोरे छावा युवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष,अविनाश पाटील हिवराळे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष,ज्ञानेश्वर लोहगावे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष,मारोती पाटील धुप्पेकर,विठ्ठल पा गाढे,दत्ताहरी पा ढगे,रंजित पा सावंत,अरुण पा हंबर्डे,ज्ञानेश्वर पा सावंत,निळकंठ पा शिंदे,शिवाजी पा जाधव,साईनाथ पा पांडे,प्रतिक पा जाधव,स्वप्निल पा सावंत,कैलास पा उमरे,अक्षय पा कवळे,पिंटु पा गाढे,प्रमेश्‍वर पा रहाटीकर इत्यादी सर्व शेतकरी पुत्र उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा