*देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर भारतीय जनता पार्टीच्या वतीने सेवा व समर्पण सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.*
याचेच औचित्य साधून माननीय आमदार राणाजगजितसिंहजी दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि भारतीय जनता पार्टी तुळजापूर तालुक्याच्या वतीने यमगरवाडी येथील वासल्य सामाजिक संस्था येथे एकल महिलांना चादरी व गौशाळेत गायींना पशुखाद्य दिले.
तसेच समर्थ बूथ अभियानामधील लाभार्थी आणि देशकार्यात मोलाचे कार्य करणार्या शेतकरी बांधावांना प्रमाणपत्र देऊन आभार व अभिनंदन केले.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष विजयजी शिंगाडे,सहकार आघाडी जिल्हा संयोजक नारायण भाऊ ननावरे, साहेबराव घुगे, सुहास साळुंके, आनंद दादा कंदले, उमेशजी मिटकरी, वासल्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अण्णा सरडे, राम चोपदार, सागर पारडे, अनिल जाधव, गोविंद पारवे, मकरंद लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा