*तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने,विविध मागण्यासाठी भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, व तुळजापूर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले*
आज दिनांक, २८ सप्टेंबर २०२१,रोजी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,सोयाबीनचे गडगडणारे भाव स्थिर ठेवणे, वीज वसुली सुरू करण्याच्या हालचालींचा पुनर्विचार करावा, उसाची एक रकमी एफआरपी मिळावी, या मागण्यासाठी आज दिनांक २८ सप्टेंबर २०२१, रोजी तुळजापूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले,तसेच तुळजापूर तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले, या रास्ता रोको आंदोलनाला उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते,या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, नेताजी जमदाडे,गुरुदास भोजने,राजाभाऊ हाके,धनाजी पेंदे, यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्या आहेत,या रास्ता रोको आंदोलनात अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा