मंगेश सुरवसे सि ए परीक्षा उतीर्ण
एस बी शिदे वार्ताहर निमगाव टे
निमगाव टे दि 13 माढा तालुक्यातील निमगाव टे येथील मंगेश पोपट सुरवसे हा सि ए परीक्षा उतीर्ण झाला आहे
इंन्सटियुट आँफ चार्टर्ड अंकौटट आँफ इंडिया या संस्थेमार्फत जुलै 21 मधे ही परीक्षा घेण्यात आली होती
विशेष म्हणजे मिळेल ते कामकरुन त्याने शिक्षणपुर्ण केले आहे
त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण निमगाव टे येथे झाले असून ज्युनिअर काँलेज विदयाप्रतिष्टाण बारामती व सिनियर काँलेज मोरे विदयालय पुणे येथे पूर्ण केले आहे एम काँम ची पदवी पुणे विदयापिठ येथून बहीस्थ विद्यार्थी म्हणून मिळवली आहे
घरच्या प्रतिकूल परिस्थिती तून त्याने हे घवघवीत यश मिळवले आहे
त्याच्या यशाबद्दल आमदार बबनदादा शिदे आमदार संजयमामा शिदे जि.प.सदस्य रणजित सिह शिदे सभापती विक्रमसिंह शिदे माढा व्यलफेअर चे अध्यक्ष धनराज शिदे सरपंच यशवंत शिदे यांनी सत्कार करून अभिनंदन केले
त्याची निवड झाल्याचे समजताच फटाक्यांची आतषबाजी करून व पेढे वाटून जलोष करण्यात आला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा