Breaking

शनिवार, ४ सप्टेंबर, २०२१

लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा सत्कार*



*लोहारा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे व नवनिर्वाचित तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा सत्कार*




         हराळी ग्रामपंचायत यांच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार काकडे यांनी लोहारा पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्यानंतर सत्कार करण्यात आला. तसेच हराळी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल कॅप्टन सुरेश सुर्यवंशी यांचा मा.सुनीलकुमार काकडे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हराळी हे गाव माजी सैनिकांचे म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात ओळख आहे. त्यामुळे विशेष अभिनंदन साहेबांनी यावेळी ग्रामस्थांचे केले. यावेळी हराळीचे उपसरपंच रवींद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन सुर्यवंशी, युवराज पाटील, रमेश सुर्यवंशी, भैय्यासाहेब धाडवे, सुनील रनखांब, दगडू सय्यद, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, श्रीराम धानुरे, अनिल बिराजदार इ. उपस्थित होते.

प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा