Breaking

शनिवार, २५ सप्टेंबर, २०२१

युवकांनी जिद्दीने व चिकाट्टीने व्यवसायात उतरले पाहिजे - बंडा गोडसेवडूज येथील अमोल स्नैक्स सेंटरचा शुभारंभ

युवकांनी जिद्दीने व चिकाट्टीने व्यवसायात उतरले पाहिजे - बंडा गोडसे

वडूज येथील अमोल स्नैक्स सेंटरचा शुभारंभ

वडूज प्रतिनिधी / शरद कदम

      बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःचे कुटुंब चालविण्याकरिता व समाजातील जडणघडणीत युवकांनी उद्योग क्षेत्रात उतरून जिद्दीने व चिकाट्टीने उद्योग व्यवसाय करणे गरजेचे असून स्वतःच्या पायावर उभे राहावे असे वडूज येथील यश प्लाझा मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या अमोल स्नैक्स सेंटरच्या  शुभारंभप्रसंगी जि.प. माजी सदस्य प्रा.एन.एस.उर्फ बंडा गोडसेसर यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक सचिनशेठ माळी, येरळा दर्शनचे उपसंपादक शरद कदम, भगवे वादळ ग्रुपचे धनाजी गोडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       यावेळी गोडसे पुढे म्हणाले की, सध्याच्या कोरोना काळात अनेक जणांचे उद्योग व्यवसाय बंद झाले असून उद्योगधंदयात अनेक अडचणी निर्माण होत आहेत यावर मात करून तरूणांनी उद्योग व्यवसाय करताना जिद्द आणि चिकाटी ठेवली पाहिजे. यावेळी सचिनशेठ माळी, शरद कदम, धनाजी गोडसे यांनी ही आपली मनोगते व्यक्त केली. 
       कार्यक्रमास अमोल सुर्यवंशी, अमोल देशमुख, संदिप गोडसे, शहाजी गोडसे सर, दत्तात्रय गोडसे, धैर्यशील देशमुख, अजितकुमार देशमुख आदि सहमान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनाजी गोडसे यांनी केले तर आभार सेंटरचे मालक अमोल सुर्यवंशी यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा