Breaking

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

पिलीव परीसरातील अनेक कार्यकर्यत्यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदावर निवडी


*पिलीव परीसरातील अनेक कार्यकर्यत्यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदावर निवडी        




    पिलीव प्रतिनिधी - माळशिरस तालुक्यातील पिलीव परीसरातील कार्यकत्यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विविध पदावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उत्तम राव जानकर, युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने,ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष सोमनाथ पिसे यांच्या उपस्थितीत वेळापुर येथे निवडी करण्यात आल्या .यामध्ये पिलीव येथील कुमारसिंग भैस ( पिलीव शहराध्यक्ष) ,ग्रामपंचायत सदस्य जिवन गुरव ( पिलीव ब्लॉक अध्यक्ष) ,नितीन कपने ( माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोषाध्यक्ष),कुमार लोखंडे ( माळशिरस तालुका सामाजिक न्याय उपाध्यक्ष) ,विजय पिसे( राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल तालुका संघटक) ,तर कुसमोड येथील शुभम धायगुडे ( राष्ट्रवादी युवक  काँग्रेस माळशिरस तालुका सहकोषाध्यक्ष ) ,तर काळमवाडी येथील भुजंगराव शिंगाडे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस माळशिरस तालुका सरचिटणीस पदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे तसेच झिंजेवस्ती येथील लहु पाटील यांची माळशिरस तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटकपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीनंतर सर्व नुतन पदाधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सदर निवडीवेळी पिलीवचे माजी सरपंच अमोल मदने, संग्राम पाटील, नागरी आघाडी चे अध्यक्ष आरिफखान पठाण, मोहन करांडे,अशोक बगाडे ,महावीर धायगुडे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व नुतन पदाधिकारी यांचा आज पिलीव येथे संतोष पडळकर, शिवराज पुकळे,महावीर धायगुडे, झिंजेवस्ती चे उपसरपंच प्रकाश पाटील, राजाभाऊ मदने, सुनील मदने, नानासाहेब मदने ,संदीप मदने यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. फोटो - पिलीव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करताना संतोष पडळकर, महावीर धायगुडे, राजाभाऊ मदने,शिवराज पुकळे व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा