Breaking

मंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर काटे यांची निवड*



*सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष पदी ज्ञानेश्वर काटे  यांची निवड*


        पिलीव (प्रतिनिधी) 

 माळशिरस तालुक्याचे युवा नेते मा.श्री.ज्ञानेश्वर मारूती काटे यांची सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष मा.श्री.विलास चेळेकर साहेब यांनी निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पश्‍चिम महाराष्ट्र ओ बी सी सेलचे प्रभारी मा.श्री. लातीफभाई तांबोळी यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवेढा तालुकाध्यक्ष मा.श्री. भारत बेदरे साहेब व मंगळवेढा तालुक्याचे युवा नेते मा.श्री. रामेश्वर मासाळ साहेब उपस्थित होते.
       ज्ञानेश्वर काटे हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत असून समाजातील गोरगरीब तसेच सर्वसामान्य लोकांना नेहमीच मदत करत असतात. त्यांच्या निवडीबद्दल माळशिरस तालुक्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांद्वारे सत्कार समारंभ आयोजित करण्यात येत आहेत. नुतन जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर काटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष    आदरणीय मा.श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना.श्री अजितदादा पवार साहेब, खासदार मा.सौ.सुप्रिया ताई सुळे,  प्रदेश सरचिटणीस मा.श्री. शंकरनाना देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष मा.श्री.बळीराम ( काका ) साठे साहेब,  राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हाध्यक्ष मा.श्री. विलास चेळेकर साहेब, प्रदेश युवक सरचिटणीस मा.श्री. संकल्प डोळस साहेब, माळशिरस तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.श्री. उत्तमराव जानकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा