एकल भगिनींच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार-भाजपा तालुकाध्यक्ष श्री.संतोष बोबडे
मंगरूळ:-वात्सल्य सामाजिक संस्थेचे एकल महिलातील काम हे कौतुकास्पद असून त्यांच्या पाठीशी मोठ्या भावाप्रमाणे उभे राहणार असे मत भारतीय जनता पक्षाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष श्री.संतोष बोबडे यांनी व्यक्त केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला जन्मदिवस आहे त्या निमित्ताने देशभर दि. 17 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर हा आठवडा सेवा आणि समर्पण सप्ताह म्हणून साजरा केला जातो.याची सुरूवात मंगरूळ येथील वात्सल्य सामाजिक संस्थेमध्ये एकल महिलांना तुळजापूर तालुका भाजपच्या वतीने चादरींचे वाटप तसेच गोशाळेतील गायींना गोग्रास देऊन करण्यात आली.तुळजापूर तालुका पेट्रोल पंप असोसिएशन चे अध्यक्ष श्री.आनंद कंदले यांनी नरेंद्र मोदी यांच्या जीवनाविषयी माहीती दिली
प्रारंभी मान्यवरांनी संस्थेतील श्रीगणेशाचे पूजन करून आरती केली.संस्थेअंतर्गत एकल महिलांसाठी चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती घेतली.यावेळी तालुका भाजपच्या पतीने परिसरातील अकरा शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान पत्र पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दिले गेले.
याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. विजय शिंगाडे,जिल्हा प्रसीद्धीप्रमुख श्री.साहेबराव घुगे,माजी नगराध्यक्ष श्री.सुहास साळुंखे,रुग्ण कल्याण समिती सदस्य श्री.आनंद कंदले,उद्योग आघाडीचे श्री.नारायण नन्वरे,पंचायत समिती सदस्य श्री.चित्तरंजन सरडे,सोसायटीचे चेअरमन श्री.हरिभाऊ वट्टे,बाजार समितीचे संचालक श्री.अनिल जाधव युवा मोर्चाचे श्री.मकरंद लबडे,श्री.राम चोपदार,श्री.सागर कदम,आरळीचे सरपंच श्री.गोविंद पारवे,काळेगावचे सरपंच श्री.आनंदराव पाटील,नांदुरीचे उपसरपंच श्री.हनुमंत पाटील, ग्रामपंचायत सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा