*मोडलिंब ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मोडलिंब ग्रामस्थ समस्यांच्या विळख्यात*28 ऑक्टोबरला आंदोलन*
**************************
मोडनिंब प्रतिनिधी / माढा तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून मोडनिंब च्या ग्रामपंचायत ला ओळखले जाते ग्रामपंचायत मुळे कधीकधी राजकारणाचे वारे फिरले जाते अशा मोडलिंब ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे मोडनिंब चेक ग्रामस्थ आज समस्यांच्या विळख्यात सापडले असून मोडनिंब येथील
दत्तनगर मोडनिंबमधील नागरिक अनेक समस्यांना तोंड देत असून सुविधा आणि विकासापासून वंचित असल्याने या भागात मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून दिनांक २८ ऑक्टोबर २०२१रोजी मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर समोर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्री हनुमंत कुंभार यांनी दिली.
दत्तनगर मोडनिंब ही नवीन वसाहत असून या भागातील नागरिक मोडनिंब ग्रामपंचायतीला सर्वाधिक व नियमित मालमत्ता कर भरतात सुमारे वीस वर्षापासून दत्तनगर मधील नागरिक पक्क्या व मजबूत रस्त्यांची स्वप्न पाहत आहेत. ते अद्यापही पूर्ण न झाल्याने आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत पक्क्या रस्त्याने आम्हाला जाता यावे अशी वृद्ध नागरिक केविलवाणी माफक अपेक्षा व्यक्त करत आहेत. पावसाळ्यात या भागातील नागरिकांना रस्त्यावर खड्डे, पाण्याची डबकी व चिखल यामुळे जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांचे भयानक हाल होतात पावसाळ्यात या भागात साधा मुरूम टाकायचे औदार्य सुद्धा ग्रामपंचायतीने दाखवले नाही. तसेच तुंबलेल्या गटारी व चेंबर यामुळे घाण पाणी रस्त्यावर वर लोकांच्या दारात येते दुर्गंधी सुटलेली असते डास व रोगजंतूंमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा खूप मोठा धोका आहे या भागातील नागरिकांच्या खालील मागण्यांची पूर्तता ग्रामपंचायतीने करावी म्हणून गुरुवार दिनांक २८/१०/२०२१ रोजी मोडनिंब ग्रामपंचायत कार्यालयासमोर शांततेच्या मार्गाने व कोरोनाचे सर्व नियम पाळून हलगी नाद आंदोलन करण्यात येणार आहे.
*दत्तानगर मधील नागरिकांच्या वेदना*
१) दत्तनगर (मोडनिंब) मधील सर्व अंतर्गत रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात यावेत.
२) तुंबलेल्या गटारी व चेंबरची दुरुस्ती करून त्या पुन्हा तुंबणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.
३) गट नं.१२६ लिंगायत स्मशानभूमीतील (आदर्श नगर रोड) अतिक्रमण काढण्यात यावे त्यास कंपाउंड वॉल करून ते बंदिस्त करण्यात यावे.
४) सदर स्मशानभूमीत पाणी, स्वच्छता, बैठक व्यवस्था व अन्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
५) मोडनिंब मध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग ढीग आहेत त्याची वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी.
माढा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनदादा शिंदे यांनी मोडनिंब मधील अंतर्गत रस्त्यासाठी एक कोटी पेक्षा अधिक रक्कम दिलेली असतानाही मोडनिंब ग्रामपंचायतीचे अंतर्गत रस्त्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे.
सदर आंदोलनाच्या निवेदनावर हनुमंत कुंभार गुरुजी व विजयकुमार परबत यांच्या सह्या असून आज दिनांक २०/१०/२०२१ रोजी सदर आंदोलनाची नोटीस ग्राम विकास अधिकारी मोडनिंब श्री कालिदास मोहिते भाऊ साहेब यांना देण्यात आलेली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा