कणसेवाडीचे धनाजी लवळे यांच्या हाती राष्ट्रवादीचे घडयाळ
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
खटाव तालुक्यातील एनकूळ कणसेवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व काही काळ मुंबई येथील शिवसेनेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असणारे धनाजी लवळे यांनी दिवड येथे राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत व खटाव माणचे नेते, माजी आयुक्त प्रभाकर देशमुखसाहेब, जिल्हा बँकेचे संचालक प्रा.अर्जूनराव खाडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात आपल्या कार्यकर्त्यासह जाहीर प्रवेश केला. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, नियोजन समिती सदस्य नंदकुमार मोरे, खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिपदादा मांडवे, कणसेवाडीचे उपसरपंच अनिलभाऊ खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री लवळे म्हणाले की, मी समाजकार्यात व राजकारणात गेली २५ वर्ष सक्रीय असून मुंबई स्थित असताना शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामे करून घेतली. नंतर गावी येऊन एनकूळ , कातरखटाव, निमसोड परिसरासह तालुक्याच्या सामाजिक कार्याबरोबर राजकारणात सक्रीय राहिलो. परंतु गावच्या हितासाठी आणि एनकूळ भागाच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश करून आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या विचाराने पुढील वाटचाल सुरू ठेवणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा