*इंदापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इंदापुरमध्ये कडकडीत बंद..
इंदापूर प्रतिनिधी - आदित्य बोराटे
उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकरी बांधवांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका बंद करून मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या बंद दरम्यान राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी रास्ता रोको करत मोदी सरकारच्या जुलमी राजवटीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे पाटील यांनी सांगितले की,मोदी सरकार सत्तेत आल्यापासून शेतकरी बांधव तसेच सर्वसामान्य गोरगरीब दलित,अल्पसंख्यांक समाजावर सातत्याने अन्याय-अत्याचार करत आहेत.आपल्या न्याय हक्कांसाठी लोकशाही मार्गाने केंद्र सरकार विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर सत्तेचा दुरुपयोग करून मोदी सरकार दाबून टाकत आहे.ईडी-सीबीआय सारख्या संस्थांचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना संपविण्याचे कारस्थान भाजप सरकार करत आहे.त्यामुळे आम्ही मोदी सरकारचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत.या प्रसंगी लखीमपूर या ठिकाणी आंदोलना दरम्यान मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी रास्ता रोको प्रसंगी राष्ट्रवादीचे वरिष्ठ उपाध्यक्ष शिवाजीराव पानसरे सर, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव ननवरे,नगरसेवक अनिकेत वाघ, पोपट शिंदे,पदवीधर सेल चे तालुकाध्यक्ष रमेश पाटील,भटक्या विमुक्त सेलचे तालुकाध्यक्ष आण्णासाहेब धोत्रे, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख ॲड.नितीन कदम,शिवसेना शहरप्रमुख महादेव सोमवंशी,माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस,राजेश चौघुले,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष संजय देवकर,युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख,साजन ढावरे,सागर पवार,अहमदराजा सय्यद,वासिम बागवान यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा