*सांगवी (काटी) येथील मातंग समाजातील मिस्त्री सुधाकर शेंडगे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपीस अटक करण्यात यावे, या मागणीसाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले*
मौजे सांगवी(काटी) येथील मातंग समजातील श्री सुधाकर आबा शेंडगे यांना गावातील काही गाव गुंडांनी जाती वाचक शिवीगाळ करून जीव मारण्याचा प्रयत्न केला, यामुळे त्या गावातील त्या गावगुंडावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मा. तहसीलदार साहेब व मा. डी. वाय. एस. पी. मॅडम यांना निवेदन देण्यात आले, यावेळी मानवी हक्क विभाग काँग्रेस पक्ष चे तुळजापूर तालुका अध्यक्ष मा. सरदार कांबळे , न्यू भारतीय टायगर सेना तालुका अध्यक्ष मा. मल्हारी कांबळे व न्यू भारतीय टायगर सेना यमगरवाडी शाखा अध्यक्ष मा. तुकाराम कांबळे लहुजी शक्तीनेचे शाखा अध्यक्ष मा. दत्तू कांबळे उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा