Breaking

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

*तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छता अभियान संपन्न*


*तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वच्छता अभियान संपन्न*


तुळजापूर,दि.२ येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर हे शै.वर्ष २०२१-२०२२ सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत आहे,तर भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे हाच दुग्धशर्करा योग साधून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आजादी का अमृतमहोत्सव या कार्यक्रमांतर्गत कुलस्वामिनी आई  तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त प्रा.आशपाक आतार यांच्या हस्ते प्रतिमापूजन करुन अभिवादन करण्यात आले,यानंतर सर्व स्वयंसेवकांनी माता तुळजाभवानी मंदिर परिसरात जाऊन प्रवेशद्वारासमोरील आणि व्यापारी संकुलासमोरील स्वच्छता मोहीम राबवली.या स्वच्छता अभियानासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थान येथील इंतुले,विश्र्वास कदम,प्रविण अमृतराव तसेच महाविद्यालयातील प्रा.श्रीमती कदम एस.एम,श्रीमती मगरे एम एन,श्रीमती कदम के एस,प्रा.वागतकर एस टी,प्रा.वसावे एम.जी,प्रा.बाळासाहेब कुकडे,प्रा.डॉ.एम.आर.आडे,प्रा.डॉ.गुंड बी डब्ल्यू यांचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.एस.एम.देशमुख, कार्यक्रमाधिकारी प्रा.अण्णासाहेब वसेकर तसेच प्रा विवेकानंद चव्हाण यांनी पुढाकार घेतला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या ४० स्वयंसेवकांनी या स्वचछता अभियानात आपला सहभाग नोंदविला .सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार व कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन संपन्न झाला.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा