Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

वारे -सुर्वे लग्नसोहळ्यात वधू वरांची हेलिकॉप्टरने एन्ट्री; करमाळ्यात दिवसभरात दिवसभर चर्चा*



*वारे -सुर्वे लग्नसोहळ्यात वधू वरांची हेलिकॉप्टरने एन्ट्री; करमाळ्यात दिवसभरात दिवसभर चर्चा*


करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

      जातेगाव येथील पुणे स्थित उद्योजक नानासाहेब वारे पाटील यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यात वधू पित्याने वधू वरांना पुण्याहून हेलिकॉप्टर ने करमाळ्यात आणले.  या अनोख्या विवाह सोहळ्याची दिवसभर चांगलीच चर्चा होताना दिसली.
       जातेगाव येथील शहाजी उर्फ नानासाहेब वारे यांची कन्या माधुरी व करमाळा येथील उद्योजक स्व. दिलीप सुर्वे यांचे चिरंजीव मनोज यांचा विवाह सोहळा पोथरे येथील आनंदी लॉन्स मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गरुडझेप घेतलेले उद्योजक नानासाहेब वारे यांची वधू - वरांना हेलिकॉप्टर मधून सफर करत विवाहसोहळ्यात आणण्याची इच्छा होती. त्यानुसार पुणे येथून वधू वरांना हेलिकॉप्टर मध्ये बसवून करमाळा येथे आणण्यात आले.यावेळी करमाळा शहर व परिसरातील युवक ,ग्रामस्थ यांनी हेलिकॉप्टर राईड चा अनुभव घेतला. दिवसभर हेलिकॉप्टर शहर परिसरात घिरट्या घालत होते.युवकांनी हेलिकॉप्टर सोबत सेल्फी घेत सोशल मीडियावर स्टेटस टाकून आनंद व्यक्त केला.हेलिकॉप्टर च्या माध्यमातून विविध करमाळा येथील कमलाभवानी मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. नागरिकांनी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी केली.पिंपरी चिंचवड, पुणे,अहमदनगर, सोलापूर परीसरातील विविध सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवर या लग्नसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.वधुपिता नानासाहेब वारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा