Breaking

शुक्रवार, ८ ऑक्टोबर, २०२१

तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करुन चौक सुशोभित करणे बाबत, सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना तुळजापूर भिमसैनिकांच्या वतीने निवेदन*



*तुळजापूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करुन चौक सुशोभित करणे बाबत, सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजय मुंडे यांना तुळजापूर भिमसैनिकांच्या वतीने निवेदन*


घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पूतळा तुळजापूर शहरामध्ये उभा राहावा या गेले अनेक वर्षाच्या समाज बांधवाची मागणी आहे. 
सदर काम तुळजापूर विकास प्राधिकरण अंतर्गंत प्रस्थावित असून सदर कामास मिळाली मा. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, नगर परिषद यांनी २६ रोजी झालेल्या बैठकित डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करणे व चौक सुशोभिकरण करणे कामास नवीन सुधारित प्रस्तावास प्रशासकिय मंजुरीसाठी नगरविकास विभाग, राज्य सरकारकडे पाठविले असून तो तो अद्याप प्रलंबित आहे. यामुळे पूर्णांकृती पूतळा उभा करण्यास विलंब होत आहे.
तरी मंत्री मुंडे यांनी त्यांच्या स्थरावर पाठपूरावा करून मंजूरी मिळवून द्यावी. व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पूतळा उभा करणे कामास प्रत्यक्ष सुरुवात व्हावी या मागणीचे निवेदन तुळजापूर भिमसैनिकांच्या वतीने देण्यात आले.
सदर निवेदनात सागर कदम,कूणाल रोंगे, अनमोल शिंदे, विशाल शिंगाडे, किरण कदम, कमलेश कदम, लक्ष्मण कदम, विनोद भालेकर, सुधिर सोनवणे, चेतन कदम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा