आंतरजिल्हा अट्टल दरोडेखोर गावठी पिस्टल सह जेरबंद : माळशिरस पोलिसांची दमदार कारवाई एकूण आठ लाखाचा मुद्देमाल जप्त .
पिलिव प्रतिनिधी
आंतरजिल्हा अट्टल दरोडेखोर गावठी पिस्टल सह जेरबंद केले एकूण आठ लाखाचा मुद्देमाल जप्त माळशिरस पोलिसांची दमदार कारवाई केली आहे .सदर ची घटना अशी की, माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी येथे गावामध्ये एक चॉकलेटी रंगाची बोलेरो गाडी व त्यामध्ये तीन इसम संशयित रित्या त्यामध्ये फिरत आहेत अशी गुप्त माहिती माळशिरस पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ सपोनि शशिकांत शेळके , सपोनि घोळकर व माळशिरस पोलीस ठाणे कडील सर्व कर्मचारी यांनी शिंगोर्णी गावचे हद्दीतील नरळे वस्ती येथील उसाच्या शेता जवळ सापळा लावला व ती बोलेरो गाडी व त्यात असणारे तीन इसमापैकी दोन इसम यांना पकडण्यात यश आले. व शिंगोर्णी येथील सराईत गुन्हेगार गाडी तून उतरून पळून गेला.
गाडीला गराडा घातला असता त्यातील एक आरोपी निफाड नाशिक येथील व दुसरा आरोपी गंगापूर औरंगाबाद येथील आसून या आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल ,एक चाकू मिळून आला तो तसेच आरोपी वापरत असलेले बोलेरो गाडी नंबर एम एच १४ ए झेड ७८९८ ही गाडी ही पोलिसांनी जप्त करण्यात आले आहे. तसेच गाडी मध्ये तपासणी केली असता गाडी मध्ये कोयता ,दोन कपड्याच्या गोण्या ,एक लोखंडी कटावणी असे साहित्य मिळून आले .
त्यानंतर माळशिरस पोलीस ठाणेस गुरनं ५७५/२०२१ शस्त्र अधिरीनियम ३,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर पोलिसांनी बोलेरो गाडी विषयी चौकशी केली असता ही गाडी आरोपींनी गाडीचा नंबर डूप्लिकेट आहे आसे निदर्शनास आल्यानंर पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता आरोपींनी सांगितले की ही गाडी आम्ही धुळे येथून चोरून आणली आहे असे सांगितले नंतर तात्काळ पोलिसांनी पोलीस ठाणे देवपूर पश्चिम येथे विचारले आसता त्यांना गुरनं २७१/२२१ भादविक ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद असल्याची माहिती मिळाली.
तसेच जप्त असलेल्या कपड्याच्या दोन गोण्या बाबत विचारणा केली असता आटपाडी हद्दीतील दिघांची आटपाडी रोड वरील जय भवानी कलेक्शन हे दुकान फोडून कपड्या सहित रोख रक्कम ही चोरी केली असल्याचे आरोपींनी सांगितले.हा ही गुन्हा उघडकीस आला आहे . तसेच नाशिक हून चोरून आणलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली असून निफाड पोलीस ठाणे कडील दाखल गुन्ह्यातील गेला माल असल्याने तो ही जप्त करण्यात आला आहे.
सदर च्या आरोपी हे अट्टल दरोडेखोर असून त्यांच्यावर त्यांच्या विरुद्ध धुळे ,नाशिक,सांगली ,अहमदनगर जिल्ह्यामधे या आरोपीवर दरोडे या सारखे गुन्हे दाखल असल्याचे व यामधील एक आरोपी हा तीन वर्ष कारावासाची शिक्षा ही भोगून आला असल्याचे ही उघडकीस आले आहे.तसेच हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून नाशिक,धुळे,अहमदनगर जिल्ह्यातील आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक दिपरतन यांनी वर्तविली आहे. सदर चे आरोपी त्यांच्या गावापासून दूर येऊन घरफोडी जबरी चोरी करणेत सराईत असल्याचे ही त्यांनी सांगितले. सदरच्या आरोपींना जेरबंद करण्यासाठी पो कॉ दत्ता खरात यांनी आरोपींची गोपनीय महत्वपूर्ण माहिती कडण्याची कामगिरी बजवली असे पो नि गायकवाड यांनी सांगितले . सदर गुन्ह्याचा तपास सपोनि शेळके हे करीत आहेत .
सदरची कामगिरी श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण , श्री हिम्मतराव जाधव अप्पर पोलीस अधीक्षक , श्री डॉ बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग ,श्री दीपरतन गायकवाड माळशिरस पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शेळके,सहायक पोलीस निरीक्षक घोळकर ,पो हे कॉ तुळशीराम गायकवाड , पो हे कॉ पंडित मिसाळ , पो ना सुशिल साळुंखे , पो ना वैभव लेंडवे,पो ना राहुल वाघ , पो कॉ दत्ता खरात ,पो कॉ सोमनाथ माने ,पो कॉ सतीश धुमाळ , पो कॉ अन्वर आत्तार सायबर ,होमगार्ड संतोष शिंदे यांनी केला आहे .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा