*शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल यशकल्याणीचे गणेश करे-पाटील युवासेनेच्या सामाजिक पुरस्काराने सन्मानित*
*करमाळा तालुका प्रतिनिधि- अतुल वारे पाटील*
करमाळा तालुक्यातील शिवसेना प्रणित युवासेनेच्या वतीने आज विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रात योगदान देणा-या व्यक्तींना सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कोव्हीड काळातील आरोग्य सेवेबद्दल डाॅ.लोकरे आणि करमाळा पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मा.श्री.प्रविणजी साने यांना सन्मानित करण्यात आले.यशकल्याणीचे गणेश करे-पाटील यांना शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शाळांसाठी केलेली प्रेरणादायक मदत व उस्फूर्त योगदानाबद्दल सामाजिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळेस सोलापूर जिल्ह्याचे उपजिल्हा शिवसेना प्रमुख मा.श्री.भरतभाऊ आवताडे, करमाळा शहराचे युवासेना प्रमुख
मा.श्री.विशालभाऊ गायकवाड,तरटगावचे सरपंच डाॅ.अमोल घाडगे, युवासेनेचे तालुका समन्वयक मा.श्री. शंभूराजे फरतडे आणि करमाळा युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा