पुणे विभागीय सरपंच सेवा महासंघाच्या उपाध्यक्षपदी शारदा भस्मे
वडुज प्रतिनिधी / शरद कदम
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडुज ( कर्मवीर नगर ) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ.शारदा सजंय भस्मे यांची पुणे विभागीय महिला उपाध्यक्षा म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही संघटना सरपंचाच्या न्याय व हक्कासाठी लढणारी महाराष्ट्रातील एकमेव नोंदणीकृत संघटना आहे. आज पर्यंत राज्य कार्यकारिणीने शासनस्तरावर विविध मागण्या मंजूर करून घेतल्या हे उल्लेखनीय आहे.
सातारा जिल्ह्यातील वडूज हे खटाव तालुक्यातील प्रमुख शहर आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या विविध क्षेत्रातील पुरस्कारकार प्राप्त सौ. शारदा संजय भस्मे यांच्या सामाजिक कामाचा संघटना वाढीसाठी अनुभव बघता त्यांच्या खांद्यावर पुणे विभागीय महिला उपाध्यक्षा म्हणून जबाबदारी राज्य कार्यकारिणीच्या सल्ल्यानुसार सरपंच सेवा महासंघ संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम अंबादास घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, राज्य संपर्क प्रमुख राहुल मारोतराव उके, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देउन संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली.
यावेळीते सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राज्याअध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, राज्य मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले, कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य संपर्कप्रमुख राहुल उके, कोअर कमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, राज्य संघटक आण्णासाहेब जाधव, राज्य सल्लागार हनुमंत सुर्वे, राज्य संघटीका ज्योती अवघड, राज्य कार्यकारिणी सदस्य सतिश साखरे, भाऊसाहेब गिराम सोशल मीडिया प्रमुख भाऊसाहेब कळसकर, पुणे विभागीय अध्यक्ष चंद्रकांत गव्हाणे, संजिवनी कापरे, पुणे जिल्हा सौ. क्रांतीताई गाढवे, सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण घोरपडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रवीण यादव, सरपंच माझा चे संचालक रामनाथ बोर्हाडे यांची उपस्थिती होती.
या नियुक्तीबद्दल सौ.भस्मे यांचे सातारा, कोल्हापूर , माळशिरस, विटा, कराड व वडूज परिसरातून अनेक मान्यवरांकडून अभिनंदन शेत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा