Breaking

बुधवार, २७ ऑक्टोबर, २०२१

*



*तुळजापूर तालुक्यातील सारोळा येथील डॉ. नितीन धाकतोडे यांना पी. एच. डी. पदवी.*




 तुळजापूर तालुक्यातील सारोळा या छोट्या  गावामधून आलेले नितीन धाकतोडे  यांनी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई येथून डेव्हलपमेंट स्टडीज  मध्ये पी. एच. डी. प्राप्त केली आहे. डॉ. धाकतोडे यांचा शैक्षिणक प्रवास खूपच आव्हानात्मक राहिला आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण सारोळा या आपल्या गावी तर माध्यमिक शिक्षण कामेगाव या आपल्या आजोळी  पूर्ण केले. बारावीपर्यंत चे शिक्षण तुळजाभवानी महाविद्यालय येथून केले. पदवीचे शिक्षण त्यांनी समाज कार्य या विषयात  टाटा  सामाजिक विज्ञान संस्था (TISS)  तुळजापूर येथून केले आणि मास्टर्स TISS मुंबई मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रादेश सरकार मध्ये तीन वर्ष कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्य केले. 

२०१४ साली त्यांनी एम. फिल. चे शिक्षण घेण्याचे ठरविले, २०१६ मध्ये त्यांनी एम. फिल इन डेव्हलोपमेंट स्टडीज TISS मुंबई मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार च्या प्रकल्पावर TISS मधेच Programme Coordinator पदावर कार्य केले. TISS मधून तीन पदव्या प्राप्त केल्या नंतर त्यांनी पी. एच. डी इतर विद्यापीठातून करण्याचा विचार केला. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉम्बे (IIT) मध्ये पी. एच. डी प्रवेशासाठीची कठीण परीक्षा पास केली, परंतु त्यांच्या संशोधनाच्या विषयात योग्य गाईड न मिळाल्यामुळे त्यांनी पी.  एच. डी. TISS मधेच करण्याचे ठरविले. पी. एच. डी. च्या कालावधी (२०१८-१९) मध्ये डॉ. धाकतोडे यांची निवड ऑस्ट्रिया देशातील नामांकित विद्यापीठात एक सेमिस्टर स्टडी एक्सचेंज प्रोग्राम साठी निवड झाली. त्यांनी या अभ्यास कालावधी मध्ये ऑस्ट्रिया मधील या विद्यापीठात विविध नवीन विषय जसे 'स्मार्ट सिटी', 'सोशोलॉजी ऑफ इकोनॉमिक्स', 'पब्लिकेशन', 'थिसीस रायटिंग', 'जर्मन भाषा' असे  विषय अभ्यासले.

मार्च २०२०  पासून एकूणच सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करणे कठीण झाले होते. कोविड  मुळे विद्यापीठे बंद आहेत, संशोधकांना ग्रंथालया शिवाय पी. एच. डी. थिसीस लिहणे कठीण होते. परंतु डॉ. धाकतोडे यांनी या कठीण काळात मेहनत करून, स्वतः पुस्तके विकत घेऊन आपले थिसीस लिहून पूर्ण केले आणि २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्यांनी ते डिफेन्ड केले.  डॉ. धाकतोडे यांनी आपल्या संशोधनातून शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध स्कीम आणि पॉलिसी मध्ये होत असलेल्या सामाजिक भ्रष्टाचाराचा नवीन सिद्धांत मांडला आहे.

त्यांच्या या संशोधन आभ्यासासाठी गाईड म्हणून डॉ. शैलेशकुमार दारोकर यांचे तर, डॉक्टरल अडवायजरी कमिटी मेंबर म्हणून प्रख्यात प्रोफेसर डॉ. जीन ड्रेझ, प्रोफ. मौलुश्री व्यास, प्रोफ. बेक यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे मोठे बंधू सचिन धाकतोडे, आई-वडील, बहीणी-भाऊ व शिक्षक यांचे  मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या या यशाचे त्यांच्या कुटूंबीय व मित्र परिवाराकडून कौतुक होत आहे. 

डॉ. धाकतोडे हे सध्या अमेरिकेतील दोन विद्यापीठाद्वारे केल्या जाणाऱ्या संशोधन प्रकल्पावर संशोधक पदावर पार्ट टाइम (ऑनलाईन) काम करत आहेत. पुढे त्यांनी परदेशातून पोस्ट डॉक्टरेट करण्याचे ठरविले आहे. त्याच्या या यशाचे कौतुक व पुढील वाटचालीस खलील  मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या डॉ. सुरेंद्र धाकतोडे, डॉ. रमेश जारे (अधिष्ठाता TISS तुळजापूर), राम राठोड, डॉ. दयानंद वाघमारे, सुधीर मस्के (साह्यक प्राध्यापक दिल्ली),मिलिंद रोकडे (जिल्हा नेते वंचित बहुजन आघाडी)जिवन कदम (जिल्हा युवक कार्य सदस्यVBA) अप्पासाहेब सुरवसे (आदित्य क्लासेस, तुळजापूर) , सिद्धार्थ बनसोडे (नगरसेवक उस्मानाबाद), मुकुंद पवार (सरपंच सारोळा),  ज्ञानेश्वर बनसोडे,  प्रशांत कांबळे, सचिन दिलपाक, राकेश जेठीथोर, दयानंद धाकतोडे, समाधान धाकतोडे, राहुल गायकवाड, धीरज क्षीरसागर आदींनी शुभेच्छा  दिल्या आहेत.


प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा