*तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालयात कोरोना लसीकरण मोहीम आयोजित*
तुळजापूर,दि२७, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शासनाच्या युवा स्वास्थ्य मोहीमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि जिल्हा उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या सहकार्याने दिनांक २९/१०/२०२१ रोजी कोवीशिल्ड प्रथम व द्वितीय लस देण्यात येणार आहे.सदर लसीकरण सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून ज्यांचे वय वर्षे १८ पूर्ण झाले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी व नागरीकांनी सदर लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.एम.मणेर यांनी केले आहे.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा