*तुळजापूर येथे लसीकरनाला गती देण्यासाठी लीडर महिलांची कार्यशाळा संपन्न*
उस्मानाबाद जिल्हयात कोरोना लसीकरनाला गती देण्यासाठी गावपातळीवर काम करणाऱ्या महिलांचे एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.
स्वयं शिक्षण प्रयोग,पंचायत समिती, तुळजापूर ,आरोग्य विभाग, NSE, यांच्या संयुक्त विद्यमाने गाव पातळीवर लीडर म्हणून काम करणाऱ्या महिलां साठी कवच प्रकल्प अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तुळजापूर येथे आयोजन केले होते. यामध्ये 90 पेक्षा जास्त गावातील महिला उपस्थित होत्या.
या कार्यशाळेत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रशांतसिंह मरोड स्वयं शिक्षण प्रयोग च्या तबसुम मोमीन,
गट विकास अधिकारी प्रशातसिंह मरोड यांनी लसीकरणसाठी गाव पातळीवर कसे काम करू शकतो. या बदल लीडर महिलांना मार्गदशन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या च्या तबसुम मोमीन यांनी प्रकल्प उद्देश,कामाची व्याप्ती गाव पातळीवर जन जागृती ,
ग्रह भेटी, ग्राम पातळीवरील कामे या बदल महिलांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेत लिडरची भूमिका जबाबदारी स्वयं शिक्षण प्रयोगचे बाळासाहेब काळदाते , माधव गोरकट्टे ,दीपाली थोडसरे, यांनी उपस्तीत महिलांना विविध विषयांवर मार्गदशन केले,कार्यक्रमाचे सूत्र संचलन स्वयं शिक्षण प्रयोगच्या रोहिणी घोडके यांनी केले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा