Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

प्रजापिता ब्रह्माकुमारी अध्यात्मिक संस्थेतील ज्ञानामुळे निश्चित समाजपरिवर्तन होईल.... स्वरुपाराणी मोहिते- पाटील



प्रजापिता ब्रह्माकुमारी अध्यात्मिक संस्थेतील ज्ञानामुळे निश्चित समाजपरिवर्तन होईल..........स्वरुपाराणी मोहिते- पाटील


 बेंबळे। प्रतिनिधी।     मुकुंद रामदासी             


                 प्रजापिता ब्रह्मकुमारी सेवाकेंद्रामधून मिळणाऱ्या अध्यात्मिक ज्ञानामुळे घराघरातून सकारात्मक व आदर्श परिवर्तन होत आहे व त्यामुळे पर्यायाने समाजातील अज्ञान व गैरसमज तसेच चुकीच्या मार्गाची वर्तणूक यामध्ये देखील निश्चित परिवर्तन होइल यावर आमचा व आमच्या घराण्याचा पूर्ण विश्वास निर्माण झाला आहे.  ब्रह्माकुमारी केंद्राबाबत आमच्या मनातील गैरसमज दूर झाले असून आम्ही नशीबवान व भाग्यवान ठरलो आहोत., अशा सर्वांगीण परिवर्तनाच्या वेळी या  अध्यात्मिक केंद्रांमधील बहेनजी निमित्तमात्र ठरत असतात हे निश्चित असे विचार, अकलूज जिल्हा परिषद सदस्या कुमारी स्वरूपा दीदी मोहिते-पाटील यांनी टेंभुर्णी येथील ब्रह्माकुमार ई-सेवा केंद्राने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहेत. सेवानिवृत्त अधिकारी ब्रह्माकुमार वासुदेव कुलकर्णी यांचा अमृत महोत्सव व कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या स्वरुपाराणी मोहिते पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून आपले विचार व्यक्त करत होत्या.या कार्यक्रमास सुलक्षणादेवी जयसिंह मोहिते पाटील ,ब्रह्माकुमारी सोलापूर झोनच्या प्रमुख सोमप्रभा बेहेनजी ,शिवरात्रि बेहेन, गीता बहेन, अनिता बहेन सायली बहेन, हेमलता पावले, डॉक्टर ए एस पावले व अनेक प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थित होते. टेंभुर्णी गीतापाठशाळा सेवा केंद्राच्या प्रमुख संचालिका अनिता बेहेनजी यांनी मान्यवरांचे स्वागत करुन केले व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला .
                    स्वरुपाराणी मोहिते पाटील  म्हणाल्या की मी प्रजापिता ब्रह्मकुमारी या अध्यात्मिक ज्ञानाचा सात दिवसाचा कोर्स पूर्ण केला आहे. या ज्ञानामुळे माझ्या मातोश्री व परिवारातील इतर सर्व सदस्य देखील प्रभावित झाले असून आम्हाला सकारात्मक विचारसरणीचा उत्कृष्ट  अनुभव येत आहे व याचा फायदा आम्हाला आमच्या दररोजच्या राजकीय व सामाजिक जीवनासाठी उपयोगी ठरत आहे. ब्रह्माकुमारी अध्यात्मिक ज्ञानामुळे राजयोगाचे शिक्षण व परमात्म्याचा परिचय ही भाग्यवर्धक दैवी देणगी असून स्वतःचे कुटुंब व समाजपरिवर्तनासाठी अत्यंत  प्रभावी माध्यम आहे ठरणार आहे हे निश्चित. सर्व क्षेत्रातील कर्तृत्ववान स्रीयांचा नेहमीच सन्मान केला जातो याच प्रमाणे अध्यात्मिक क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करून समाजातील सर्व घटकांना त्याचा लाभ मिळवून देणाऱ्या या ज्ञानातील समर्पित बहिणींचा देखील सन्मान व्हावा असे मनापासून वाटते. प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेत ज्या भगिनी समर्पित वृत्तीने आलेल्या आहेत व अध्यात्मिक ज्ञानाचा 'स्वपरिवर्तनातून विश्व परिवर्तन' असा प्रचार व प्रसार सर्व विश्वात करत  आहेत या सर्व माता भगिनींच्या धीरोदात्त आई-वडिलांचा सन्मान व्हावा अशी आमची मनोकामना आहे ,मनस्वी इच्छा आहे व यासाठी आमचे मोहिते पाटील कुटुंब सर्वतोपरी सहकार्य करील असेही स्वरूपा दीदी म्हणाल्या. ....'अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर पडण्यासाठी ज्ञानाच्या  प्रकाशाचे अवलंबन व अनुकरण करण्यासाठी कोण जागृत असणार आहे' ....हे पाहण्यासाठीच ईश्वराने कोजागिरी पौर्णिमा निर्माण केली आहे असेही दीदींनी याप्रसंगी सांगितले.

     सोलापूर झोनच्या प्रमुख सोमप्रभाबेहेनजी या वेळी म्हणाल्या की सर्वात जास्त ब्रह्मकुमारी गीता पाठशाळा माढा तालुक्यात असून सहयोगी व्यक्तींची संख्याही मोठी आहे ,असेच  जिल्ह्यातील  प्रत्येक तालुक्यामधून व्हावे अशी आमची शिवबाबा चरणी प्रार्थना आहे. याप्रसंगी निवृत्त अधिकारी व मागील तीस वर्षांपासून ब्रह्माकुमारी अध्यात्मिक ज्ञानात असलेले वासुदेव कुलकर्णी व त्यांच्या सुविद्य पत्नी रंजना कुलकर्णी यांचा अमृत महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 'प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेतील अध्यात्मिक ज्ञान, राजयोग व मुरली यामुळेच मी व माझे कुटुंबीय सुखी, समाधानी व समृद्ध जीवन व्यतीत करत असल्याचे कुलकर्णी यांनी सन्मानाला उत्तर देताना सांगितले.
 डॉक्टर पावले व सौ हेमलता पावले यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्वांचे आभार मानले, यानिमित्त ब्रह्माभोजनाचे आयोजन करण्यात आले होते .या कार्यक्रमास अकलूज, माळीनगर, टेंभुर्णी, बेंबळे, शिराळ, अकोले बुद्रुक, भिमानगर, मोडणींब,व कुर्डूवाडी या ठिकाणाहून अनेक प्रतिष्ठित मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा