Breaking

बुधवार, २० ऑक्टोबर, २०२१

तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शोकसभा*


*तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शोकसभा*


तुळजापूर :- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये माजी मंत्री तथा बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण साहेब यांच्या धर्मपत्नी कै.शालिनी (काकू) मधुकरराव चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करण्या साठी शोकसभे चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास दादा बोरगावकर साहेब  यांची उपस्तिथी होती. प्रास्ताविक सुत्रसंचालनात श्रद्धांजली अर्पण करताना काकू सामान्य पक्ष कार्यकर्ता यांचा अगदी मुला प्रमाणे सांभाळ करत असत असे प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी सांगितले,यावेळी श्रद्धांजली अर्पण करत असताना  महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. अनिल शित्रे उपप्रचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्रचार्य प्रा. रमेश नन्नवरे ,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांची उपस्तिथी होती.
प्रारंभी कै.शालिनी काकू यांना सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर सर्वांनी शोक व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रा. संभाजी भोसले यांनी शालिनी काकू च्या जुन्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली पर  विचार व्यक्त केले, प्रा. रमेश नन्नवरे यांनी स्त्री ही घरासाठी किती महत्वाची आहे असे सांगितले.प्राचार्य डॉ. शित्रे यांनी  काकूंचे घराप्रति असणारे प्रेम किती होते अश्या शब्दात श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी अध्यक्षीय समारोप श्रद्धांजली अर्पण करत असताना उल्हास दादा बोरगावकर साहेब यांनी काकू ह्या घरातील जबादारी  मोठया हिमतीने पेलत होत्या असे विचार व्यक्त केले.या         शोकसभे  साठी प्रो. डॉ.सुरेंद्र मोरे, प्रा.डॉ. अंबादास बिराजदार,प्रा. श्रीरंग लोखंडे, प्रा.डॉ. सतीश कदम ,प्रा. डॉ.जोतिबा  राजकोंडा,प्रा. कोरेकर सुमित्रा, प्रा. अमोद जोशी,डॉ. सतीश महामुनी,श्री. शाहूराज घोडके,कृष्णा कोळी सर्व प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्तिथी होती.


प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा