Breaking

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कोट्यवधी रुपयांचा अपहार......* *खातेदाराच्या खात्यावरील लाखो रुपये परस्पर गायब.......* *"संमंधीत खातेदारांचे पैसे बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था होईल.."**..गुन्हेगारांची सखोल चौकशी होऊन त्यांना कठोर शासन करण्यात येईल.... शैलेश कोथमिरे* बँकेचे,प्रशासक


*जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कोट्यवधी रुपयांचा अपहार......*
 *खातेदाराच्या खात्यावरील लाखो रुपये परस्पर गायब.......*




 *"संमंधीत खातेदारांचे पैसे बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था होईल.."*

*..गुन्हेगारांची सखोल चौकशी होऊन त्यांना कठोर शासन करण्यात येईल.... शैलेश कोथमिरे*
                       बँकेचे,प्रशासक

        बेंबळे। प्रतिनिधी /मुकुंद रामदासी  

                      माढा तालुक्यातील पिंपळनेर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खातेदारांच्या खात्यातील शंभर रुपयापासून लाखो रुपयांची रक्कम परस्पर इतर खात्यावर ट्रान्सफर करून ती तातडीने काढण्यात आलेली आहे व अशाप्रकारे कोट्यावधी रुपयांच्या रकमेचा अपहार करण्यात आलेले निदर्शनास आले आहे.

 आपल्या खात्यावरील पैसे गायब होत आहेत ही गंभीर बाब खातेदारांना समजताच पिंपळनेर व परिसरातील खातेदारांच्या मध्ये एकच गडबड गोंधळ उडाला असून खातेदारांची, आपले खाते तपासून पैसे काढून घेण्यासाठी बँक कार्यालयापुढे झुंबड उडालेली  आहे.
        वृत्तांत असा की पिंपळनेर डीसीसी बँकेमध्ये अनेक शेतकरी, मजूर, वृद्ध, महिला, निराधार, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी, अपंग, दिव्यांग व अशा अनेकांची खाती अनेक वर्षापासून आहेत. परंतु यातील अनेकांना त्यांच्या खात्यावरील पैसे देताना थोडी कमी रक्कम देऊन' बँकेचा सर्वर बिघडलेला आहे' असे सांगून परत पाठवण्यात येत होते . आपली शिल्लक राहिलेली रक्कम काही दिवसांनी काढण्यासाठी बँक खातेदार बँकेत जाताच खात्यावर शिल्लक असलेले पैसे हडप झालेले त्याच्या लक्षात येत होते , व हा प्रकार मागील वर्षी देखील काही थोड्या खातेदारांच्या बाबतीत घडलेला होता असे नागरीकातुन बोलले जाते. हा गोंधळ आधी शंभर रुपये, एक हजार रुपये यापासून ते आता लाखो रुपयापर्यंत झाला असल्याचे सध्या निदर्शनास आले आहे, व आता या रकमेचे एकुण स्वरूप कोट्यावधी रुपये पर्यंत निश्चित जाईल अशी चर्चा सर्वत्र चालू आहे , त्यामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत.
         चौकट.....
 ही बातमी समजताच बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक गोरे ,पाटील ,संतोष वरपे ,कुर्डूवाडी चे पोलीस  उपनिरीक्षक यांनी तातडीने पिंपळनेर बँकेमध्ये येऊन खातेदारांना संयम राखून लेखी तक्रार दाखल करण्याचे आव्हान केले आहे, त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देण्यासाठी शेकडो नागरिक सध्या तयार असल्याचे दिसून येत आहे. या अपहारप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुर्डूवाडी पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार  दाखल झालेली नाही असे कुर्डूवाडी चे पोलीस अधिकारी हरिदास बोराटे यांनी सांगितले. 
चौकट......
       आमचे वरिष्ठ अधिकारी पिंपळनेर शाखेत या अपहार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेले आहेत व चौकशी करत आहेत. परस्पर पैसे गायब झालेल्या खातेदारांची यादी आमचेकडे वरिष्ठ कार्यालयात येताच संबंधित सर्व खातेदारांची माहिती घेऊन सर्वांचे पैसे मंगळवार , बुधवार पर्यंत त्यांच्या खात्यात जमा होतील अशी मी व्यवस्था करतो, तसेच या  घोटाळ्यांमध्ये जे बँक कर्मचारी,अधिकारी किंवा  इतर कोणी असतील त्यांची रीतसर, कायदेशीर चौकशी होऊन त्यांच्यावर कडक व कठोर कारवाई निश्चित करण्यात येईल , त्यामुळे खातेदारांनी घाबरून न जाता आलेल्या प्रसंगाला संयमाने तोंड द्यावे व बँकेवर विश्वास ठेउन आम्हाला सहकार्य करावे .
            शैलेश कोथमिरे,
          प्रशासक/मुख्य व्यवस्थापक
 सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
          मुख्य कार्यालय सोलापूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा