Breaking

रविवार, २१ नोव्हेंबर, २०२१

तालुक्याला पंचवीस पंधरा मधून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ बबनराव शिंदेनगोर्लीत 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन



तालुक्याला पंचवीस पंधरा मधून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर - आ बबनराव शिंदे


नगोर्लीत 36 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन 

सतिश काळे/ भिमानगर


टेंभुर्णी (प्रतिनिधी):- तालुक्याला पंचवीस पंधरा मधून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ती कामे तातडीने ग्रामपंचायत च्या वतीने पूर्ण करून घ्यावीत. गावकऱ्यांनी सुचवलेली कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येतील तसेच करोना मध्ये विधवा झालेल्या महिला व मुलांसाठी शासनाच्या वतीने देण्यात येणारी 20 हजार व मुलांसाठी एक हजार रुपयांची मदत मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायती मार्फत प्रयत्न करावेत त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन आ बबनराव शिंदे यांनी दिले.
    
नगोर्ली (ता.माढा) येथे विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार बबनदादा शिंदे यांचे शुभहस्ते तसेच जि.प सदस्य-रणजितसिंह शिंदे, शिवाजीराव पाटील, संजय पाटील भिमानगरकर यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी आयोजित कर्यांकर्मात ते बोलत होते.
प्रारंभी पंचवीस पंधरा मधून दहा लाखाचे रस्त्याचे काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक, जगदंबा माता मंदिर सभामंडप ७ लाख, भर्तरीनाथ मंदिर सभामंडप ५ लाख, दलित वस्ती कॉंक्रीट रस्ता ३ लाख, १४ वा वित्त आयोगातून ड्रेनेज ६ लाख, पानंद रस्ता एक लाख, १५ वा वित्त आयोग काँक्रिट रस्ता दोन लाख, जि प शाळा वॉल कंपाउंड दोन लाख रुपये असे ३६ लाख रुपयाच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले टेंभुर्णी ते गारअकोले अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी तहसीलदार व बीडिओ यांचे एक कमिटीची नेमणूक केली आहे. त्यांच्या वतीने अपूर्ण असलेले रस्त्याचे काम पूर्ण करून घ्यावे त्यासाठी मी प्रयत्न केले जातील. नगोर्लीच्या नवीन सरपंच, उपसरपंच व त्यांच्या सर्व सदस्यांनी चांगल्या पद्धतीचे काम केले असल्याचे आमदार शिंदे यांनी कौतुक केले. 

अनिल पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. पुढील काळात सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह आम्हीं सर्वजण आ बबनदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीचे कामकाज करणार असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. 

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रंजीतसिंह शिंदे शिवाजी पाटील, संजय पाटील भिमानगरकर यांनी आपले विचार व्यक्त करत गावच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आमदार बबनदादा च्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

यावेळी चित्राताई वाघ, कारखान्याचे संचालक सचिन देशमुख, परमेश्वर देशमुख, पांडूरंग घाडगे, बाळासाहेब चंदनकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका प्रसिध्दी प्रमुख सतिश काळे, सरपंच-सुवर्णाताई भानवसे, उपसरपंच-राणीताई ढवळे, सरपंच हरिभाऊ माने, माणिक झिंजे, पांडुरंग माने, तानाजी सलगर, लालासाहेब मोरे, रघुनाथ वाघ, संंतोष ढवळेे, कैलास नवले, रामभाऊ नवले, सिध्देश्वर महाडीक, अनिल महाडीक, आबाजी महाडीक, नवनाथ महाडीक, सोमनाथ ढवळे, आजिनाथ भोसले, ग्रामसेवक शेंडेे भाऊसाहेब व ग्रामस्थ उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ पाटील यांनी तर आभार मगनदास महाडिक यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा