Breaking

रविवार, १४ नोव्हेंबर, २०२१

*श्री गणपती फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध*




*श्री गणपती फार्मसीमध्ये विनाशुल्क अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध*


 प्रथम वर्ष बी फार्मसीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

अमोल भोसले 


टेंभुर्णी (प्रतिनिधी)- अकोले खुर्द.ता.माढा येथील श्री गणपती फार्मसीमध्ये
प्रथम वर्ष बी.फार्मसी (पदवी) च्या प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि. १३ नोव्हेंबर 2021 पासून सुरू झाली असून ही रजिस्ट्रेशन प्रक्रिया दि.  २१ नोव्हेंबर 2021 पर्यंत चालणार आहे' अशी माहिती श्री गणपती संस्थेचे सचिव  डॉ.आर. डी. बेंदगुडे  व प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे यांनी दिली.
           महाराष्ट्र शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.श्री गणपती फार्मसी मध्ये  सॅनिटायझेशन व सोशल  डिस्टनसिंग पाळून ऑनलाईन रजिस्ट्रेशनची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे,स्कॅन केलेली कागदपत्रे अपलोड करणे आदी बाबींचा समावेश आहे.ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ही प्रक्रिया दि. १३ नोव्हेंबर २०२१ पासून सुरू झालेली आहे. प्रथम वर्ष बी. फार्मसी (पदवी) प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि.२१ नोव्हेंबर २०२१ पर्यंत चालेल.रजिस्ट्रेशन साठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत. रजिस्ट्रेशन फी ऑनलाईन भरण्यासाठी एटीएम किंवा रोख रक्कम आणावी. प्रवेश प्रक्रियेच्या नंतरच्या टप्प्यात अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणे,प्रथम व द्वितीय फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे आदी बाबींचा समावेश आहे. फार्मसी प्रवेशा संदर्भात अधिक माहितीसाठी (७७४५०८२७५४),(९५४५५५३६९०) या क्रमांकावर संपर्क साधावा.प्रवेश अर्ज भरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन आपला अर्ज भरावा व कन्फर्मेशन करून घ्यावे असे आव्हान करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा