*तुळजापूर तालुक्यातील सांगवी मार्डी येथे तोष्णीवाल परिवाराकडून सभामंडपाचा लोकार्पण सोहळा पार पडला*
सांगवी मार्डी येथे तोष्णीवाल परिवाराकडून सभामंडपाच्या, दि,०५ नोव्हेंबर २०२१, रोजी दीपावली पाडवा या सणाचे औचित्य साधुन लोकार्पण सोहळा पार पडला, दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही तोष्णीवाल परिवार सांगवी मार्डी येथे दिवाळी पाडव्यासाठी उपस्थित राहून मातृभूमीचे ऋण फेडणे या उदात्त हेतूने,सार्वजनिक सभामंडप बांधकाम स्वखर्चातून पूर्ण करून त्याचा लोकार्पण गावाच्या वापरासाठी करण्यात आले,तसेच सांगवी मार्डी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले, गावचे प्रथम नागरिक सरपंच श्री, गोविंदराव जाधव यांच्या हस्ते संपूर्ण तोष्णीवाल परिवाराचा सत्कार करण्यात आला,तसेच तोष्णीवाल परिवाराच्या वतीने इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा