Breaking

शनिवार, ६ नोव्हेंबर, २०२१

राँग साईडने मोटार सायकल चालवून समोरून येणाऱ्या मोटार सायकलला धडक..... अकोले चा युवक प्रज्योत नवले जागीच ठार .... .........इतर दोघे जखमी .......



राँग साईडने मोटार सायकल चालवून समोरून येणाऱ्या मोटार सायकलला धडक.....
 अकोले चा युवक प्रज्योत नवले जागीच ठार ....
 .........इतर दोघे जखमी .......


      फोटो.. मयत प्रज्योत नवले
         
            वृत्तांत असा की गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वा.चे सुमारास अकोले बुद्रुक येथून प्रज्योत राजेंद्र नवले वय 19 व पृथ्वीराज राहुल काळे हे दोघे भेंडी विकण्यासाठी अकोले बुद्रुक हुन टेंभुर्णी कडे मोटारसायकल वरुन जात होते. त्यांची गाडी वेणेगाव हद्दीतील राजू शिंदे यांचे शेताजवळील रस्त्यावर आली असता, समोरून रॉंग साईडने आलेल्या व अतिशय बेशिस्तीने मोटारसायकल चालवत असलेल्या, ऋषिकेश ब्रह्मदेव शिंदे राहणार परितेवाडी यांने प्रज्योत नवले च्या गाडीला जोरदार धडक दिली .यावेळी घडलेल्या अपघातात प्रज्योत राजेंद्र नवले वय 19 हा युवक जागेवरच ठार झाला व त्याचे बरोबर असलेला पृथ्वीराज काळे हा दूर फेकला जाऊन जबर जखमी झाला. रॉंग साईडने येणाऱ्या ऋषिकेश शिंदे याचा भाऊ निलेश शिंदे हा देखील किरकोळ जखमी झाला असून दोन्ही मोटरसायकलींचे अंदाजे वीस ते पंचवीस हजार रु.चे नुकसान झाले आहे.
           मयत प्रज्योत नवले याचा चुलतभाऊ संतोष महादेव नवले राहणार अकोले बुद्रुक यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली असून पोलिस हेड कॉन्स्टेबल आरकिले यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गुटाळ हे अधिक तपास करत आहेत.
                   मयत  प्रज्योत नवले हा राजेंद्र नवले यांचा एकुलता एक मुलगा असून  त्याचे पश्चात आई वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. ऐन दिवाळीच्या सणात प्रज्योतचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे अकोले बुद्रुक गावात शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
********************ad*********************



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा