*बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक स्वतंत्र लढवणार - ॲड.राहुल मखरे..
इंदापूर प्रतिनिधी -आदित्य बोराटे
इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ॲड. राहुल मखरे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दि.७ नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
ॲड.राहुल मखरे म्हणाले की, इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे त्या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टी इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक स्वतंत्र लढवणार असल्याचा खुलासा ॲड.राहुल मखरे यांनी केला असून या निवडणुकीत बी एम पी ला सहा ते सात जागी यश मिळेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
जर लक्ष जाऊ की नाही हे आज सांगता येत नसले तरी आह्मी आर. एस.एस. आणि भारतीय जनता पार्टी यांच्या सोबत मात्र मुळीच जाणार नाही असा स्पष्ट निर्णय त्यांनी दिला.
तसेच शहर व तालुक्यामधे बहुजन मुक्ती पार्टी ला दोन जागा- चार जागा दिल्या आहेत अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे याचे मी खंडन करतो अशा कोणतीही गोष्ट ठरलेल्या नाहीत त्यामुळे अशा अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये.नगर परिषदेत सत्ता आली तर थकीत घरपट्टीला आकारण्यात आलेले २ टक्के व्याजदर व कोरोना काळातील दोन वर्षाची घरपट्टी माफ करू आणि शहरात केली जाणारी विकास कामे पारदर्शक विना कमिशन,गुणवत्ता पूर्ण केली जातील हा आमचा निवडणुकीतील महत्वाचा मुद्दा असेल असे ॲड.राहुल मखरे यांनी जाहीर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा