*तुळजापूर येथे एसटी कर्मचाऱ्याच्या सुरू असलेल्या संपास,तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांचा जाहीर पाठिंबा*
मागील सात दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी कर्मचारी यांनी त्यांचे "राज्य शासकीय सेवेत विलिनीकरण" करण्यासाठी आंदोलन सुरू केले असून, यामध्ये तुळजापूर आगारातील एसटी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झालेले आहेत. कर्मचारी यांची एकच मागणी असून शासनामध्ये विलीनीकरण करण्यासाठी शासनाने तात्काळ मंजुरी द्यावी. तुळजापूर शहर हे धार्मिक तीर्थक्षेत्र असून सदर संपाचा फटका येथील भाविक व पुजारी बांधवांना बसत असल्यामुळे, शासनाने एकमेव मागणी मंजूर करून सदर संप लवकरात लवकर मिटवावा.
सदर संपास जाहीर पाठिंबा देतो
सचिन ज्ञानोबा रोचकरी
अध्यक्ष तथा सर्व सन्माननीय सदस्य
नगर परिषद तुळजापूर.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा