Breaking

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०२१

शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन


शिवसेना नेते संजय कोकाटे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त फराळाचे आयोजन


टेंभुर्णी प्रतिनिधीaj24taas 
शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी दीपावली निमित्त माढा मतदार संघातील खास मुस्लिम बांधवांसाठी फराळाचे आयोजन करून सामाजिक सलोखा व एकात्मतेची भावना वृद्धिंगत केली असून आधार फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेला हा स्तुत्य उपक्रम आहे असे मत येथील मदरसा मस्जिदचे विश्वस्त युसूफ रस्तापुरे यांनी व्यक्त केले.
 आधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकाटे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून माढा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी खास दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. मुस्लिम बांधवांबरोबरच मित्र परिवाराशी फराळासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मागील ९ वर्षापासून ते हा कार्यक्रम राबवीत आहेत. याबाबत बोलताना कोकाटे म्हणाले की मुस्लिम बांधव त्यांच्या ईद निमित्त होणाऱ्या इफ्तार पार्टीस हिंदू बांधवांना आवर्जून निमंत्रित करतात आपणही आपल्या दिवाळी सणानिमित्त मुस्लिम बांधवांचे तोंड गोड करावे या सामाजिक भावनेतून आपण हा उपक्रम राबवित आहोत. पूर्वी टेंभुर्णी शहरा पुरता मर्यादित असलेला हा उपक्रम नंतरच्या काळात तालुकास्तरावर व आता माढा मतदारसंपर्यंत विस्तारित केला आहे.
 या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत, टेंभुर्णी शहरातील तिन्ही मस्जिदचे प्रमुख आदम तांबोळी, युसूफ रस्तापुरे ,रहीम तांबोळी यांच्यासह मतदार संघातील आयुब पटेल, जहीर मन्यार, शौकतभाई पटेल, युसुफ शेख, युन्नूस शेख, सिराज तांबोळी ,रफिक पठाण, जावेद जागीरदार, शब्बीर जागीरदार ,राजू तांबोळी, अजिज शेख, इसाकभाई शेख,मज्जू मुल्ला या मुस्लिम बांधवांसह भाजपचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, शिवसेना तालुकाप्रमुख मधुकर देशमुख, सुरेश लोंढे, पं. स. सदस्य अनिल जाधव, अनिल मुंडफणे, नवनाथ भगत, सरपंच विजय पवार, सागर गिड्डे, शामराव कदम,राजाभाऊ चौवरे, विनोद पाटील, बाळासाहेब ढगे, नागनाथ वाघे ,हरी सटाले, औदुंबर महाडीक, सुधीर महाडीक, रामभाऊ टकले ,निवृत्ती तांबे यांच्यासह माढा मतदार संघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा