Breaking

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

महामार्ग पथक मोडनिंब यांचेवतीने विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर वाहतुक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन-



महामार्ग पथक मोडनिंब यांचेवतीने विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यावर वाहतुक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन-


बेंबळे।प्रतिनिधी।               फोटो

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर शनिवार दि.13 नोव्हेंबर रोजी कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांचेकरीता अप्पर पोलिस महासंचालक(वाहतुक) महाराष्ट्र राज्य, मुंबई डॉ.भुषणकुमार उपाध्याय व पोलिस अधिक्षक श्री.संजय जाधव महामार्ग सुरक्षा पथक,पुणे परिक्षेत्र,पुणे यांचे मार्गदर्शनाखाली अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे दृष्टीने महामार्ग पोलिसांकडुन महाराष्ट्रभर वाहनधारकांना जनजागृतीचे प्रबोधन केले जात आहे. त्या अनुषंगाने महामार्ग पथक मोडनिंब येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय गायकवाड यांचे वतीने काररखाना कार्यस्थळावर वाहतुक सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचा सन 2021-22 गळीत हंगाम चालू असून कारखान्याकडे तोडणी वाहतुक करणारे वाहनमालक, ड्रायव्हर व बैलगाडीवान यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतुकीच्या नियमांचे अवलोकन व्हावे यासाठी महामार्ग पोलिस मोडनिंब विभागाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय गायकवाड यांनी ऊस वाहतुक करणारी वाहने व बैलगाडी यांना कशा पध्दतीने रिफ्लेक्टर बसवावेत याचे प्रात्यक्षिक दाखवून वाहतुकीच्या नियमांचे महत्त्व पटवून दिले व त्यानुसार सर्व संबंधित वाहन मालकांनी व बैलगाडीवान यांनी याची दक्षता घेण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. तसेच कर्कश आवाजात वाहनावर साऊंड बॉक्सने गाणे वाजवू नये,वेळोवेळी वाहनांची  आर.टी.ओ.कडून तपासणी करून घ्यावी,वाहन चालकाकडे लायसन्स असणे आवश्यक इत्यादी बाबत त्यांनी  मार्गदर्शन केले. तसेच कारखान्यामार्फत करारातील ऊस वाहतुक करणा-या सर्व वाहनांना सुरक्षिततेच्या दृष्टीने शासनाचे नियमानुसार पांढरा,पिवळा व लाल रंगाच्या रेडियम पट्टया बसविण्यात आलेल्या आहेत. तसेच वाहनाचे पाठीमागील  बाजूस बसविण्यासाठी कापडी रिफ्लेक्टरचे वाटप करण्यात आले

 याप्रसंगी महामार्ग पोलीस मोडनिंब विभागाचे पोलीस नाईक अभिजित मुळे व कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एन.डिग्रजे,केन मॅनेजर एस.पी.थिटे, मुख्य शेतकी अधिकारी एस.एस.बंडगर,ऊस पुरवठा अधिकारी एन.एन. गायकवाड,  हेडक्लार्क बी.एम.मुलाणी, सुरक्षा रक्षक तसेच वाहनमालक, बैलगाडीवान मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा