Breaking

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य शिबिरात 700 रुग्णांची तपासणी.


राष्ट्रवादी काँग्रेसच्या आरोग्य शिबिरात 700 रुग्णांची तपासणी.



उस्मानाबाद  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (सांस्कृतिक विभाग उस्मानाबाद )यांच्या वतीने  शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  14 डिसेंबर  रोजी भव्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात 700 नागरिकांची मोफत  तपासणी करून औषधी देण्यात आली.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य रोगनिदान व उपचार शिबीराचे आयोजन मंगळवारी  दि 14डिसेंबर सकाळी 10 वाजता रोजी भीम नगर क्रांती चौक येथे करण्यात आले होते.  डॉ.प्रतापसिंह पाटील, मा. नगराध्यक्ष संपत डोके, शहराध्यक्ष आयाज शेख, बिलाल तांबोळी,  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय पाटील,   आयोजक राष्ट्रवादी  काँग्रेसचे सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे उदघटनास  उपस्थित होते.  या शिबीरात तज्ञ  डॉ. धीरज सिन्हा, डॉ.डांगे, डॉ.अस्मिता वाघमारे, डॉ.आयेशा पठाण,  आदी तज्ञ  डॉक्टरांकडून तपासणी  नागरिकांची तपासणी करण्यात आली.   परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी रक्त, बी.पी. शुगर, डोळे तपासणी करण्यात आली.  या शिबिरात 18 नागरिकांनी रक्तदान केले तर 200  नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. 100 नागरीकांचे  कोरोना लसीकरण करण्यात आले.  महिला व पुरुषांसह 700 नागरिकांची तपासणी करून मोफत औषधी देण्यात आली.
या  आरोग्य शिबिराच्या यशस्वीते साठी महेश डावरे, सुगत सोनवणे, सागर चव्हाण,  सत्यजीत  माने, प्रसेनजीत शिंगाडे, विजय हजारे, प्रशांत सोनवणे, अविनाश शिंगाडे, यशवंत शिंगाडे, महेश शिंगाडे यांनी परिश्रम घेतले.


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा