*रेल्वे कर्मचारी औदुंबर सुतार यांचेवर आठ जणांचा खुनी हल्ला...*
*पांच दिवसांनी कुर्डुवाडी पोलिसांनी फिर्याद केली दाखल...*
*आरोपींच्या पलायनवादास माल प्रॅक्टिस "पोलिसी" हातभार...*
*नागरिकांतून संताप...सक्षम पोलिस निरीक्षकाची नागरिकांची मागणी...*
AJ 24Taas News Maharastra
कुर्डुवाडी प्रतिनिधी/अरुण कोरे यांजकडून...*
*रेल्वे कर्मचारी औदुंबर सुतार यांचेवर आठ जणांचा खुनी हल्ला...*
*पांच दिवसांनी कुर्डुवाडी पोलिसांनी फिर्याद केली दाखल...*
*आरोपींच्या पलायनवादास माल प्रॅक्टिस "पोलिसी" हातभार...*
*नागरिकांतून संताप...सक्षम पोलिस निरीक्षकाची नागरिकांची मागणी...*
*याबाबत हकिकत अशी शुक्रवारी २६नोव्हेंबर सायंकाळी साडे पाचच्या सुमारास रेल्वेची ड्युटी संपवून परतले होते.त्याचवेळी पंढरपूर रस्त्यावरील बायपास चौकात सुतार यांचें जागेत आठ दहा जण येऊन अतिक्रमण करून दांड्या लावत असताना कोर्टाचा हुकुमनामा दाखवून कोर्टाची मनाई हुकूम दाखवत असताना आम्ही कोर्टाचा हुकूम मानत नसल्याचे सांगत सुरज उर्फ टिल्लू व अक्षय पांडुरंग सुतार, दत्तात्रय सुतार, नागनाथ सुतार,सचीन सुतार, प्रविण उर्फ बबलू सुतार, मंदाकिनी सुतार व पांडुरंग सुतार या आठ जणांनी लोखंडी पार, कोयता, लाकडाने औदुंबर सुतार यांचेवर जीवे मारायच्या इराद्याने खुनी हल्ला करून पलायन केले.*
*जखमी अवस्थेत औदुंबर सुतार यांनी कुर्डुवाडी पोलिस ठाणे गाठले अन् ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार घेऊन त्यांची सोलापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले.*
*औदुंबर सुतार यांचेवर सध्या रेल्वे हाॅस्पिटल सोलापूर येथे उपचार सुरू आहेत.*
*२६ तारखेला रेल्वे कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला होऊनही पाच दिवस कुर्डुवाडी पोलिसांनी कोणतीही दखल घेतली नाही अथवा ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आला नाही.*
*तसेच आरोपींची नावे सांगूनही त्यांना पकडण्या ऐवजी मोठ्या प्रमाणात माल प्रॅक्टिस करुन त्यांच्या पलायनास हातभार लावण्याचे कारस्थान केल्याचेही उघड उघड व उलट सुलट दबक्या आवाजात सर्वत्र बोलले जात आहे.*
*दरम्यान फिर्यादी व साक्षीदारांवर दबाव टाकणे आदी ना ना प्रकार घडविण्यात आल्याचे फिर्यादीच्या वतीने सांगण्यात आले.*
*या खुनी हल्ल्याच्या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून सहायक पोलिस निरीक्षक विक्रम बोधे यांच्याकडे तपास असल्याचे पोलिसांनी सांगितले.*
*कुर्डुवाडी शहर व परिसरातील वाढत्या चो-या, दरोडे व वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यास होणारा विलंब दबावाखाली होणारी कारस्थान आदींमुळे नागरिकांचा कायदा अन् सुव्यवस्थेवरील विश्वास वरचेवर उडत चालला असून कुर्डुवाडी येथे प्रभारी अधिका-यांच्या मार्फत कारभार की प्रशासकीय सांध पकडून पळवाट याबाबतही उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.*
*सक्षम अधिका-यांची तातडीने नेमणूक करुन नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे पाच दिवसा नंतर मंगळवारी रात्री उशिरा अखेर महत्प्रयासाने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात ३०७ सह खुनी हल्ल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा