Breaking

मंगळवार, ३० नोव्हेंबर, २०२१

टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारावर कडक कारवाई करणार-- पो. नि.सुरेश निंबाळकर* *अल्पवयीन मुलीस पळवून नेहलेल्या सराईत गुन्हेगार,आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी ठोकल्या बेड्या*



*टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगारावर कडक कारवाई करणार-- पो. नि.सुरेश निंबाळकर*

अल्पवयीन मुलीस पळवून नेहलेल्या सराईत गुन्हेगार,आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी ठोकल्या बेड्या*
*******************

टेंभुर्णी (प्रतिनिधी):- अल्पवयीन मुलीस अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेहलेल्या टेंभुर्णी येथील सराईत गुन्हेगार आरोपी समाधान कोल्हे यास पुणे येथून मोठ्या शिताफीने अटक करून अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात टेंभुर्णी पोलीस स्टेशनला यश आले आहे. असून अशा गुन्हेगारांनाची गय केली जाणार नसून आरोपीस मदत करणार यावरही कारवाई करणार असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

टेंभुर्णी पोलीस स्टेशन कडून मिळालेली सविस्तर माहिती आशिकी दि. 6 /10 /2021 रोजी अल्पवयीन मुलीस आरोपी समाधान नारायण कोल्हे वय 26 वर्ष, रा. एमआयडीसी टेंभुर्णी (ता माढा) यांनी अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेले होती, म्हणून टेंभुर्णी पोलीस ठाणे भादवि कलम 363 प्रमाणे 8/10/ 2021 रोजी गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे यांनी गुन्ह्याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना मार्गदर्शन करून सदर गुन्ह्यातील पीडित अल्पवयीन मुलीचा व आरोपीचा शोध घेणे कामी विशेष पथक नेमले होते. 
त्यानुसार नेमलेल्या पथकाने आरोपीच्या मित्राच्या मार्फत व सायबर पोलिस ठाणे सोलापूर ग्रामीण यांचे मदतीने पुणे, कोल्हापुर, सातारा, इचलकरंजी येथे शोध घेतला परंतु ते मिळून आले नाहीत त्यानंतर मंगळवारी गोपनीय बातमीदारा मार्फत व सायबर पोलिस ठाण्याचे मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा व पीडित मुलीचा पुणे येथील कात्रज परिसरात शोध घेऊन तब्बल 52 दिवसानंतर आरोपी समाधान कोल्हे यास ताब्यात घेऊन पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.

सदर गुन्ह्यातील आरोपी समाधान कोल्हे हा सराईत गुन्हेगार असून आरोपीवर टेंभुर्णी पोलीस ठाणे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीने अल्पवयीन मुलीस 6/10 /2021 रोजी मुलीचे राहते घरातून अपहरण करून नेले होते. मुलीस पळवून नेले पासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. आरोपीविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाणेत यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. 

चौकट 1
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मोनाली पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पी व्ही काशीद, पो.ना विनोद साठे पो ना केशव झोळ, पो.ना अक्षय सरडे, पो. शि गणेश इंगोले, पो. कॉ प्रसाद अनभुले व सायबर पोलिस ठाण्याचे पो. ना व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने सदर आरोपीस मोठ्या शिताफीने अटक केली आहे


चौकट 2 

*गुन्हेगारांनवर कडक कारवाई केली जाईल*


वरील आरोपी सारख्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांपासून नागरिकांनी सावध राहावे. आपल्या अल्पवयीन मुलींना आशा व्यक्तींच्या संपर्कात येवू देवू नये. आवश्यकता असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. अशा गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांवरती कडक शासन केले जाईल. टेंभुर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत शेती, भावकी, राजकारण यातून भांडणाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे. टेंभुर्णी पोलीस स्टेशनचा चार्ज घेतल्यापासून तीन महिन्यात असा अंदाज आला आहे. मागील गुन्ह्याच्या प्रमाणापेक्षा मी चार्ज घेतल्यापासून तीन महिन्यांमध्ये गुन्ह्याचे प्रमाण कमी झाले आहे. 
          -- सुरेश निंबाळकर
          पोलीस निरीक्षक टेंभुर्णी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा