Breaking

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

*खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चव्हाणवाडी( टें )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*




*खा.शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त
 चव्हाणवाडी( टें )येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*


टेंभुर्णी प्रतिनिधी :- राष्ट्रवादी युवक काँग्रेस व ग्रामपंचायत चव्हाणवाडी टे यांच्यावतीने चव्हाणवाडी व परिसरातील लोकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिर  त्याचबरोबर शुगर तपासणी रक्तदाब तपासणी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या या शिबिराचे उद्घाटन शिवाजी पाटील ( जि.प.सदस्य टेंभुर्णी) वैभव कुटे  ( ता.पं.सदस्य) संभाजी पाटील ( रा.यू.कॉ.तालुकाध्यक्ष) या मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार घालून व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली . यावेळी शिवाजी पाटील ,संभाजी पाटील, रामभाऊ नवले , भजनदास गायकवाड ,हनुमंत चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या शिबिरात एकूण 107 लोकांनी सहभाग घेतला यामध्ये 52 पुरुष तर 55 स्त्रियांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये 27 मोतीबिंदू तर 18 डोळ्यावर मांस वाढलेले रुग्ण तपासणी दरम्यान आढळून आले या शिबिरात पुणे अंधजन मंडळाचे एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी हडपसर यांच्या टेंभुर्णी व्हिजन सेंटर मधील कार्यरत आरोग्य सेवक नेत्रचिकित्सक श्री अंगद शेंडगे सागर कोळेकर अजय टीपाले यांच्याकडून विनामूल्य सेवा प्रदान करण्यात आली .
 यावेळी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुका उपाध्यक्ष विक्रम सलगर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत तावरे तर प्रास्ताविक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय मिस्कीन तर आभार महेश खरात यांनी मानले.
या कार्यक्रमास चव्हाणवाडी चे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमन संचालक व सर्व ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा