Breaking

रविवार, २६ डिसेंबर, २०२१

साखर शाळेतील मुलांना शालेय साहित्य देऊन उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी वाढदिवस साजरा केला*


*साखर शाळेतील मुलांना शालेय साहित्य देऊन उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी वाढदिवस साजरा केला* 

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड: दि 25 डिसेंबर 2021 सध्या उसाचा हंगाम सुरू झाला असून मोठ्या प्रमाणावर ऊसतोड कामगारांचे स्थलांतर होते यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुटुंबच्या कुटुंब ऊसतोड करण्यासाठी कारखान्याच्या परिसरात येतात त्यांच्यासमवेत त्यांचे 6 ते 14 वयोगटातील मुलं-मुली येतात त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होतो त्यास उपाय म्हणून भाऊराव सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या मदतीने साखर शाळा चालवली जाते या वर्षी या साखर शाळेत जवळपास दीडशे विद्यार्थी आल्याचे दिसून येत आहे सदरील शाळेतील विद्यार्थ्यांना मदत म्हणून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मारतळा येथील उपक्रम शील शिक्षक रवी ढगे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून अनावश्यक खर्चाला फाटा फोडून सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले सदरील उपक्रमात बद्दल पालकांना आनंद व्यक्त केला व भाऊराव चव्हाण साखर कारखानाचे जनसंपर्क अधिकारी श्री धर्माधिकारी यांनी सुद्धा धन्यवाद व्यक्त केले यावेळी  उपक्रम शील शिक्षक रवी ढगे,प्रा अभय परिहार , बालरक्षक डॉ दादाराव सिरसाट, केन्द्र प्रमुख कानोडे ,नागेश क्यातमवार, शिक्षक संदीप,पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा