Breaking

बुधवार, १५ डिसेंबर, २०२१

आज १५ डिसेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात*



*आज १५ डिसेंबर २०२१ मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय थोडक्यात*

• मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना टप्पा-२ ची अंमलबजावणी करणार. १० हजार किमी  लांबीचे रस्ते बांधणार . (ग्रामविकास विभाग)

• महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात मुद्रांक शुल्काबाबत सुधारणा करून महसुली उत्पन्नात वाढ करणार  (महसूल विभाग)

• महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मध्ये सुधारणा करण्याचा  निर्णय.  कुलगुरू पदासाठी नावांची शिफारस राज्य शासन राज्यपालांना करणार
(उच्च व तंत्र शिक्षण)

• पुस्तकांचे गाव या योजनेचा विस्तार करणार . (मराठी भाषा विभाग)

• नगर विकास विभागात  उप सचिव तथा उप संचालक, नगर रचना संवर्गाचे  पद निर्माण करणार 
(नगर विकास विभाग)

• पैठण तालुका फळरोपवाटिका येथे मोसंबी फळपिकासाठी "सिट्रस इस्टेट" ची स्थापना करणार. (कृषि विभाग)

• कृषि विधेयके २०२१ मागे घेण्याचा निर्णय. (कृषि विभाग अन्न नागरी पुरवठा ) 

• सहकारी संस्था कायद्यात महत्वपूर्ण सुधारणा करण्यास मान्यता. (सहकार विभाग)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा