Breaking

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे महाआरोग्य दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा शिबीर पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न



उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे महाआरोग्य दंतचिकित्सा व शल्यचिकित्सा शिबीर पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा व राष्ट्रीय आरोग्य अभियान (एन एच एम) अंतर्गत आदिवासी भागातील रुग्णांसाठीउपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे भव्य मोफत ऑपरेशन महाआरोग्य शिबीर डॉ.एकनाथ माले उपसंचालक आरोग्य सेवा लातूर,डॉ.निळकंठ भोसीकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बालाजी शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांच्या आयोजनाने व मार्गदर्शनानुसार मोफत भव्य महाआरोग्य दन्त चिकित्सा व शल्यचिकित्सा ऑपरेशन शिबिर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे दिनांक ११ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ०९ ते दुपारी ०२ वाजेपर्यंत तपासणी करून निवड झालेल्या रुग्णांची दिनांक १२ ते १४ जानेवारी या दरम्यान आवश्यक शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. करिता या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.

सदरील शिबिरामध्ये तज्ञ स्पेशालिस्ट डॉक्टर फिजिशियन सर्जन स्त्री रोग तज्ञ दंतचिकित्सक नाक कान घसा नेत्ररोग तज्ञ बाल रोग तज्ञ तज्ञ डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गुरुगोविंद सिंग जी रुग्णालय नांदेड आरोग्य संस्थेतील तज्ञ डॉक्टर कडून वैद्यकीय रुग्णांची रक्तदाब मधुमेह हृदयविकार तसेच एच एच एल महालॅब्स द्वारे रक्तातील  तपासणी मोफत करण्यात येणार आहे.

हायड्रोसिल अंडवृद्धि हर्निया अपेंडिक्स  गर्भ पिशवीचा कॅन्सर चे निदान व पुढील उपचार शरीरावरील गाठी च्या शस्त्रक्रिया व शालेय मुलांच्या नियोजित शस्त्रक्रिया या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे

किनवट माहूर हिमायतनगर तालुक्यातील गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम धुमाळे डॉ. अन्सारी डॉ.साखरे डॉ. शर्मा यांनी पूर्वतयारी आढावा बैठक घेतली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.ढोले,डॉ.आर.एस.लोंढे,डॉ साबळे,डॉ.जाधव,डॉ तोटावार,डॉ घडसिंग,डॉ भुरके,डॉ राठोड ,डॉ पवार डॉ.अकोले,डॉ.ओव्हाळ ,डॉ गोनेवार, डॉ.केंद्रे,डॉ चंन्द्रे , 
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री.जांभळे,श्री.धानवे ,एच.एल एल महालॅब्स टेक्निशियन बालाजी सिरसाट,व्यंकट तोटावार,सचिन कांबळे
क्ष-कीरण  वैज्ञानिक अधिकारी श्री  धोंडगे,औषध निर्माण अधिकारी श्री.व्यंकटेश सोनटक्के ,श्री कणके,सौ.डी.एस.पाटील,श्री. कोकाटे,पंकज राठोड, सुनील जाधव अब्दुल शेख ,श्री साळवे वरिस्ट लिपिक श्री.मलदोडे इंचार्ज सिस्टर सौ.कांबळे सौ.वाघमारे सोनिया बोईनवाड,आर.बी.एस के आणि सर्व आश्रम शाळा पथक यांच्यासह सर्व अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा