नागनाथ बोड्डूंचा मोफत दवाखाना ः-आदर्श उपक्रम!-- मृदुल जोगळेकर.
सोलापूर प्रतिनिधी/AJ 24 Taas news network
सोलापूर: आजकालच्या स्वार्थी जगात जेव्हा कुटुंब कलह वाढतो आहे, कुटुंबात सत्ता आणि पैसा यासाठी खुनाचे प्रकार घडत आहेत त्या काळात श्री नागनाथ बोड्डूंसारखी व्यक्ती निस्वार्थीपणाने गरिबांसाठी मोफत दवाखाना काढण्याचे स्वप्न उरी बाळगून त्यासाठी कष्ट घेऊन ते साकार करते, हेच स्वप्नवत आहे. ज्या समाजातून आपण आलो त्या समाजाशी असलेली नाळ मजबूत करत सामाजिक बांधिलकी दर्शवणारा उपक्रम केवळ स्वतःच्या हिमतीवर सुरू करते. "मानव सेवा हीच माधव सेवा" हेच प्रेरक बोधवाक्य प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना प्रचंड कष्ट करावे लागले आहेत याची जाणीव असल्यानेच मी श्री बोड्डू यांच्या या दवाखान्याच्या उद्घाटनास येण्याचा आग्रह डावलू शकले नाही. आवर्जून उपस्थित राहण्याचे आणि माझ्या हस्ते उद्घाटन झाले यात कृतार्थता वाटते, असे भावपूर्ण उद्गार श्रीमती मृदुल जोगळेकर यांनी काढले.
श्री नागनाथ बोड्डू यांनी सेवानिवृत्तीच्या दिवशी गरिबांसाठी मोफत दवाखाना काढण्याची घोषणा केली होती, त्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी
झालेल्या एका शानदार शानदार समारंभात त्या बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रच्या सोलापूर झोनच्या झोनल मॅनेजर श्रीमती. सुनिता भोसले, सोलापुरातील प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट श्री. राजगोपाल मिनियार आणि बँक ऑफ इंडियाचे रिटायर्ड जनरल मॅनेजर श्री. प्रदीप कांबळे तसेच या दवाखान्याचे मानद वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र पंडित हे मंचावर उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन आणि धन्वंतरीचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात श्री नागनाथ बोड्डू यांनी आज तीन वर्षांपूर्वी पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती होते आहे याचे समाधान आहे, गेल्या तीन वर्षापासून प्रत्येक रविवारी अन्नदान करतो यात सर्व कुटुंबिय सहभागी असते आवर्जून नमूद केले. श्री बोड्डू यांचे सहकारी बँक ऑफ महाराष्ट्रचे रिटायर्ड अधिकारी श्री. विकार शेख आणि श्री. लक्ष्मण गुळेद यांनी व पुत्र श्री. नंदकिशोर आणि नवीन कुमार यांनी आपले मनोगत या निमित्ताने व्यक्त केले. प्रमुख पाहुण्यांची ही प्रसंगोचित भाषणे झाली. या शानदार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसाद अतनूरकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राजेंद्र पंडित यांनी केले.कार्यक्रमास नागरीकांची चांगली उपस्थिती होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा