*तुळजापूर येथे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांची गय करणार नाही. पो. नि. आजिनाथ काशीद
तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांचा टवाळखोरांना इशारा.
तुळजापूर येथे ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींची छेडछाड टवाळखोरांकडून केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यापुढे अशा टवाळखोरांबाबत तक्रार आल्यास कोणाचीही गय करणार नाही असा इशारा पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी दिला आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आवारात टवाळखोरांमुळे विद्यार्थीनीना मानसिक त्रासाला तोंड द्यावे लागते. टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरिक्षक आजिनाथ काशीद यांनी प्राचार्य शित्रे यांच्याशी चर्चा करून महाविद्यालयाच्या आवारात आणि क्लासरुममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या.
सध्या शहरातील कॉलेज, महाविद्यालय, खाजगी शिकवणी वर्गासमोर टवाळखोरांचा हौदास वाढला असून, यातून मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. शहरातील मुख्य रस्ते आणि चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे नसून अडचण असून खोळंबा अशी गत झाली आहे. यामुळे टवाळखोरांचा उच्छाद वाढला असून भुरटे चोरही सक्रिय झाल्याचे दिसत आहे.
शहरातील शाळा, महाविद्यालयात ग्रामीण भागातून येणाऱ्या मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन दक्ष आहे. कुठेही टवाळखोरांचा उपद्रव आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचा लगेच बंदोबस्त करण्यात येईल.
अजिनाथ काशीद पोलीस निरीक्षक तुळजापूर.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा