पाचाड मध्ये शहीद परिवाराचा गौरव सोहळा संपन्न
महाड – प्रतिनिधी
भारत पाक युद्धात शहीद झालेले सुंदर महादेव परब यांच्या शहीद दिनानिमित्त महाड तालुक्यातील शहीदांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला महाड तालुक्यातील शहीद परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
महाड तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड येथील सुंदर महादेव परब हे १९७१ रोजी झालेल्या भारत पाक युद्धात दिनांक ७ डिसेंबर रोजी वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी शहीद झाले. १६/०५/१९६९ रोजी सुंदर परब सैन्य दलात भरती झाले होते. त्यांच्या ५० व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने शहीद परिवार गौरव कार्यक्रम परब कुटुंबाने आयोजित केला होता. यावेळी शहीद मनोहर पवार, शहीद नथुराम गोविंद कासारे, यशवंत रामचंद्र सावंत, लक्ष्मण गमरे, सुरेश भोसले, लान्सनाईक नामदेव पवार, विश्वनाथ कोरपे, तानाजी बांदल, गणपत कळमकर, लक्ष्मण निकम, नाईक सुभेदार भरत मोरे, प्रथमेश कदम या शहिदांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळ राउळ हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा