Breaking

सोमवार, २० डिसेंबर, २०२१

बेंबळे येथे दत्तजयंती भक्तिभावाने साजरी......



बेंबळे येथे दत्तजयंती भक्तिभावाने साजरी......


बेंबळे। प्रतिनिधी।                  फोटो 

        सालाबाद प्रमाणे बेंबळे येथे दत्त जयंती उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या उत्सवाचे पौरोहित्य ज्योतिष तज्ञ संजूदेव जोशी यांच्या नियोजन व मार्गदर्शनाखाली संपन्न झाले .शनिवार दि.18 रोजी दत्त जयंती दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे संजूदेव जोशी यांनी 'श्रीं' ची पाद्यपूजा केली ,त्यानंतर दुपारी 'श्री'स पंचामृत महाभिषेक करण्यात आला. फुले, पाने व रंगीबेरंगी पताकांनी सुशोभित केलेल्या मंडपात सकाळपासूनच भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. बरोबर दुपारी साडेबारा वाजता शेकडो स्त्री-पुरुष भाविकांच्या हस्ते पुष्पवृष्टी  करून भक्तिभावाने श्री दत्तात्रेय जन्मोत्सव संपन्न  करण्यात आला. याप्रसंगी सुशोभित केलेल्या पाळण्या सभोवती अनेक भाविक महिलांनी भक्ती गीते गायली व त्यानंतर पंचामृत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. रविवार दिनांक 19 रोजी,' अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त ' असा जयजयकार करीत व बाळ- गोपाळा सहित गावातून माधुगिरी मागण्यात आली व मंदिरात भाविकांना माधुगीरीचा प्रसाद वाटप करण्यात आला.
...।। चौकट।।...
 59 वर्षाचे ज्योतिष तज्ञ संजूदेव जोशी हे वेदमूर्ती  स्वर्गीय एकनाथ विष्णुपंत तथा बाबूदेव जोशी यांचे चिरंजीव असून मागील सत्तेचाळीस वर्षापासून ते श्री दत्ताची सेवा करत आहेत. संजूदेव हे विद्यावाचस्पती व अभ्यासू भविष्यकार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैयक्तिक, कौटुंबिक, नैसर्गिक व राजकीय भविष्य जाणून घेण्यासाठी  त्यांच्याकडे सर्व थरातील नागरीकांची नेहमीच गर्दी असते. त्यांना देवतांचा अनुग्रह प्राप्त असून त्यांच्या भविष्य कथनाची सत्य प्रचिती हजारो नागरिकांना येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा