Breaking

मंगळवार, २८ डिसेंबर, २०२१

शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीदिवशी शाळेच्या आवारात ग्रामपंचायतचा पुढारी दिसल्यास त्याच्यावरती कारवाई करा......विजय् परबत*



*शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीदिवशी शाळेच्या आवारात ग्रामपंचायतचा पुढारी दिसल्यास त्याच्यावरती कारवाई  करा......विजय् परबत*


मोडनिंब प्रतिनिधी /याबाबत वृत्त असे की शासनाच्या परिपत्रकानुसार येत्या डिसेंबर अखेरपर्यंत मोडनिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलिंची शाळा व मुलांची शाळा नं 1 या शाळेच्या व्यवस्थापन समिती च्या निवडी घेणे आवश्यक आहे, परंतु या दहा वर्षांतील शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीची परिस्थिती पाहीली तर ही समिती पालकांमधून निवडणे आवश्यक आहे व तो अधिकार शासनाने मुख्याध्यापकांना दिलेला आहे, परंतु मोडनिंब येथील जिल्हा परिषद शाळेत असे न होता सर्व नियम ढाब्यावर बसवून ग्रामपंचायतीच्या म्हणण्यानुसार ह्या निवडी होतात व शासनाचा मूळ उद्देश बाजूला राहतो, पालकांना वाव मिळत नाही, व ग्रामपंचायतीचा एक पुढारी केवळ भ्रष्टाचार करण्यासाठीच व राजकारण करण्यासाठीच गेली दहा वर्ष झाली शाळेत राजकारण करत आलेला आहे, हा आतापर्यंतचा मोडनिंब जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा इतिहास आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होत नाही, आमचा विद्यार्थी शिकला पाहिजे, घडला पाहीजे अशी सर्व पालकांची इच्छा असते परंतु मोडनिंब ग्रामपंचायत शाळेत ढवळाढवळ करत असल्याने शाळा प्रत्येक बाबतीत पाठीमागे राहीली आहे, व शाळेत केवळ राजकारणच दिसत आहे, त्यामुळे मोडनिंब येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडणुका ह्या पारदर्शक पणे व शासनाच्या नियमाप्रमाणे घ्याव्यात व पालक सोडून अन्य कोणतीही व्यक्ती अथवा पुढारी, ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीच्या निवडी दिवशी शाळेच्या आवारात दिसल्यास अथवा निवडणुकीत हस्तक्षेप केल्यास त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी,, मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी, कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटविकासाधिकारी,  कुर्डूवाडी पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी यांचेकडे केली आहे, व त्यादिवशीचे सर्व व्हिडिओ काढून गरज पडल्यास आम्ही मा.न्यायालयातही जावू या सर्व जबाबदारी दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांची राहील याची नोंद घ्यावी......विजयकुमार परबत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा