नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकिय पक्षानी कंबर कसली
*📡AJ 24Taas News Maharastra/नळदुर्ग प्रतिनिधी अजित चव्हाण📡
नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसून जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी पहिल्यांदाच 20 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. नवीन प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा नगर पालिका प्रशासनाने निवडणूक विभागाला सादर केला आहे. प्रारुप आराखडा तयार करीत असताना विरोधकांना विश्वासात न घेता तो केल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर मोठया प्रमाणात आक्षेप नोंदविले जाण्याची शक्यता वृत्तविली जात आहे. तर नगरपालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक जगदाळे, भाजपाचे आमदार राणाजगजितसिह पाटील व काँग्रेसचे माझी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्यासाठी राजकीय प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे ही निवडणूक यावेळेस अंत्यत चुरशीची होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शिवसेना, मनसे यासह शहर विकास आघाडी याच्याकडूनही निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे.
नळदुर्ग नगरपालिकेची मुदत 17 डिसेंबर रोजी संपत आहे. मुदत संपण्याअगोदर एक महिना निवडणूक होणे अपेक्षित होते, मात्र हे आता शक्य नाही. त्यामुळे 17 डिसेंबरनंतर नगरपालिकेवर प्रशासक येण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा